Home /News /entertainment /

श्रुती हसनच्या घरात पडली फूट? वेगवेगळ्या ठिकाणी राहत आहेत कुटुंबीय

श्रुती हसनच्या घरात पडली फूट? वेगवेगळ्या ठिकाणी राहत आहेत कुटुंबीय

अभिनेत्री श्रुती हसन आणि तिचे कुटुंबीय सध्या वेगवेगळ्या घरांमध्ये राहत असल्याचं समोर आलं आहे.

  मुंबई, 22 मार्च : सध्या सगळीकडे कोरोना व्हायरसमुळे भीतीचं वातावरण पसरलं आहे. या व्हायरसचे देशाभरत 450 पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. या व्हायरसची दहशत एवढी आहे की जवळपास सर्वच सेलिब्रेटी सध्या शूटिंग थांबवून घरी बसले आहेत. अशाच अभिनेता कमल हसन यांच्या कुटुंबात फूट पडल्याचं वृत्त समोर आलं आहे. कमल हसन यांची मुलगी श्रुती हसन हिच्या एका इन्स्टाग्राम पोस्टवरून सध्या हे संपूर्ण कुटुंब वेगवेगळ्या घरात राहत असल्याचं समोर आलं आहे. कमल हसन यांची मुलगी श्रुती हसन सध्या आईसमवेत मुंबईत आहे मात्र हे दोघंही वेगवेगळ्या फ्लॅटमध्ये राहत आहेत. तर दुसरीकडे कमल आणि त्यांची दुसरी मुलगी अक्षरा हसन सध्या चेन्नईमध्ये आहेत. मात्र हे दोघंही वेगवेगळ्या ठिकाणी राहत आहेत. यामागचं कारण आहे कोरोना व्हायरस. हे चौघंही काही दिवसांपूर्वी परदेशातून भारतात परतले आहेत. त्यामुळे त्यांनी वेगवेगळ्या घरात राहून स्वतःला क्वारंटाइन करून घेतलं आहे. वाह! संकटकाळी व्हिलनच ठरला ‘हिरो’, केलं असं काही की सर्वांना वाटेल अभिमान मुंबई मिररला दिलेल्या एका मुलाखतीत श्रुती म्हणाली, मी बराच काळ एकटी राहिले आहे त्यामुळे माझ्यासाठी ही गोष्ट अजिबात नवी नाही. पण हे कठिण आहे कारण घरातून बाहेर पडण्यासाठी तुमच्याकडे कोणताही ऑप्शन नाही आणि लोकांच्या मनातली भीती दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. लोक या गोष्टीला गांभीर्यानं घेत आहे. एक चांगलं झालं की, मी जेव्हा परतले तेव्हा सर्व शूटिंग रद्द झाली होती. माझं संपूर्ण कुटुंब यामुळे विभागलं गेलं आहे. मी आणि आई मुंबईमध्ये असूनही वेगवेगळे आहोत तर बाबा आणि अक्षरा सुद्धा चेन्नईमध्ये वेगवेगळ्या फ्लॅटमध्ये राहत आहेत. ऋषी कपूर यांच्या योगा Video वर आलियाची कमेंट, चाहते म्हणतात; 'कपूर घराण्याची...'
  श्रुतीनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली होती. ज्यात तिनं तिचा फोटो सुद्धा शेअर केला होता आणि यासोबतच सर्वांना घरी आणि सुरक्षित राहण्याचा सल्ला दिला होता. सध्या तरी बॉलिवूडमध्ये एकच सेलिब्रेटी कोरोना पॉझिटीव्ह आहे. ती म्हणजे कनिका कपूर. नुकतीच झालेली तिची दुसरी टेस्टही पॉझिटीव्ह आली आहे. VIDEO : कतरिनाला घरात भांडी घासताना पाहून अर्जुन कपूरनं उडवली खिल्ली
  Published by:Megha Jethe
  First published:

  Tags: Bollywood, Coronavirus

  पुढील बातम्या