मुंबई, 22 जुलै : धमेंद्र आणि अमिताभ यांच्या जोडीने रंगलेला शोले या चित्रपटाने एकेकाळी बॉलिवूड गाजवलं. या चित्रपटाने कितीतरी वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. आजही हा चित्रपट कित्येक लोकांचा लोकप्रिय सिनेमा आहे. याच सिनेमानं धमेंद्र आणि अमिताभ यांना नवीन ओळख मिळवून दिली होती. चित्रपटात धर्मेंद्र यांच्याशिवाय अमिताभ बच्चन, हेमा मालिनी आणि जया प्रदा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर धर्मेंद्र आणि हेमामालिनी यांची जोडी देखील याच चित्रपटानं बनवली होती. पण बॉलिवूडच्या एका अभिनेत्याची मात्र या चित्रपटामुळं झोप उडाली होती. काय होतं याचं कारण जाणून घ्या. अमिताभ आणि धर्मेंद्र यांच्या ‘शोले’ चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून बॉलिवूड अभिनेते कमल हसन यांनी काम पाहिलं होतं. पण या चित्रपटानंतर नक्की काय घडलं होतं याबद्दल अभिनेत्याने नुकतंच एक खुलासा केला आहे. ‘शोले’ हा चित्रपट सर्वांनाच आवडतो, पण कमल हसनने त्याबद्दल एक अनोखी गोष्ट सांगितली. कमल हसनने जेव्हा हा चित्रपट पाहिला तेव्हा त्याला त्याचा तिरस्कार वाटला.
कमळ हसनने ‘कल्की 2898 एडी’ च्या प्रमोशनल कार्यक्रमादरम्यान सांगितले की, तो अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र स्टारर ‘शोले’ चित्रपटाचा तिरस्कार करत असे. कमल हसनला ज्या रात्री हा चित्रपट पाहिला त्या रात्री झोप लागली नाही. याविषयी बोलताना कमल हसन म्हणाले की, ‘जे शोले चित्रपटाचे चाहते आहेत त्यांच्यासाठी सांगतो की, मी या चित्रपटाचा सहाय्यक दिग्दर्शक होतो. मी जेव्हा हा चित्रपट पाहिला त्या रात्री मला झोप येत नव्हती. पहिली गोष्ट, मी चित्रपटाचा खूप तिरस्कार करत होतो. पण त्यापेक्षा जास्त तिरस्कार मी रमेश सिप्पी यांच्यासारख्या महान चित्रपट निर्मात्याचा करत होतो.’ Uorfi Javed: ‘दारूच्या नशेत त्यांनी माझ्यासोबत…’ उर्फी जावेदचा धक्कादायक खुलासा चित्रपटाचा तिरस्कार करण्याचं कारण सांगत कमल हसन पुढे म्हणाले की, ‘‘मला त्या महान चित्रपट निर्मात्यासोबत काम करण्याची संधी मिळाली आणि मी चित्रपट पाहिल्यावर ही माझी प्रतिक्रिया होती असे मी रमेश सिप्पींना सांगितले. एक तंत्रज्ञ या नात्याने, मला त्या रात्री झोप लागली नाही आणि हा असाच चित्रपट आहे…असे अनेक चित्रपट अमितजींनी केले आहेत आणि त्यांना माझ्या चित्रपटांबद्दल छान गोष्टी सांगताना ऐकणे ही गोष्ट मी सहाय्यक दिग्दर्शक असताना आणि पाहत असताना कल्पनाही केली नव्हती. धन्यवाद, अमित जी’’ असं ते म्हणाले आहेत. ‘शोले’ आणि ‘कल्की 2898 एडी’ व्यतिरिक्त, कमल आणि अमिताभ यांनी ‘गिरफ्तार’ मध्ये देखील काम केले होते, ज्यात रजनीकांत देखील होते. प्रभास, राणा दग्गुबती यांच्यासह कमल हसन यांनी त्यांचा नवीन चित्रपट ‘कल्की 2898 एडी’ पुढील वर्षी 12 जानेवारी 2024 रोजी रिलीज होणार आहे. आधी या चित्रपटाचं नाव ‘प्रोजेक्ट के’ असं ठेवण्यात आलं होतं. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि दीपिका पदुकोण यांच्याही भूमिका आहेत, तर या चित्रपटाचं नाग अश्विन यांनी केले आहे.