• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Kamal Haasan यांच्या सिनेमाने प्रदर्शनापूर्वीच केला 'विक्रम'; 48 सेंकदाच्या Video ला मिळाल्या कोटी व्ह्यूज

Kamal Haasan यांच्या सिनेमाने प्रदर्शनापूर्वीच केला 'विक्रम'; 48 सेंकदाच्या Video ला मिळाल्या कोटी व्ह्यूज

कमल हसन (Kamal Haasan) यांच्या आगामी सिनेमाचा (Vikram) फर्स्ट लुक नुकताच प्रदर्शित झाला आहे. सोशल मीडियावर हा लूक धुमाकूळ घालत आहे. प्रेक्षकांनी कमल हसन यांच्या विक्रम सिनेमातील फर्स्ट लुकला डोक्यावर घेतले आहे.

 • Share this:
  मुंबई, 8 नोव्हेंबर: साउथमध्ये कलाकारांच्याबद्दल एक वेगळेच प्रेम पाहायला मिळते. चित्रपटाच्या पहिल्या लुकवर भरभरून प्रेम करणारी ही मंडळी फक्त साउथमध्ये आढळते. दाक्षिणात्य सुपरस्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कमल हसन (Kamal Haasan) यांच्या आगामी सिनेमाचा (Vikram) फर्स्ट लुक नुकताच प्रदर्शित झाला आहे. सोशल मीडियावर हा लूक धुमाकूळ घालत आहे. प्रेक्षकांनी कमल हसन यांच्या विक्रम सिनेमातील फर्स्ट लुकला डोक्यावर घेतले आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कमल हसन यांनी 7 नोव्हेंबर रोजी आपल्या 67 वा वाढदिवस साजरा केला त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या आगामी विक्रम (Vikram) सिनेमाचा फर्स्ट लुक प्रदर्शित करण्यात आला आहे. विक्रम सिनेमाचा फर्स्ट लुकमध्ये कमल हसन फुल टू ॲक्शन मोडमध्ये दिसत आहेत. 48 सेंकदाचा हा व्हिडीओ पूर्णपणे अॅक्शनने भरलेला आहे. वाचा : कतरिना-विकीची लगीनघाई; कबीर खानच्या घरी पार पडला 'रोका' हा व्हिडीओ प्रदर्शित होताच राज कमल फिल्म्स इंटरनॅशनल यांनी ट्विट करत लिहिले आहे की, विक्रम सिनेमाचा फर्स्ट लुक लाँच होताच 24 तासाच्या आत एक कोटीपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत. चित्रपटाच्या पहिल्या लुकला प्रेक्षकांचा मिळालेल्या प्रतिसादावरून आपल्या लक्षात येईल की, या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना किती उत्सुकता आहे. या व्हिडीओमध्ये कमल हसन यांचा हटके अंदाज पाहण्यात येत आहे. ट्वीटरसहीत अन्य सोशल मीडियावर फ्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. 'विक्रम'मध्ये अनिरुद्धचे संगीत आहे आणि गिरीश गंगाधरन सिनेमॅटोग्राफर आहेत. फिलोमिन राज यांनी संपादित केलेल्या या चित्रपटात अभिनेते विजय सेतुपती देखील आहेत. याचे दिग्दर्शन एन सतीस कुमार यांनी केले आहे. कमल हसन यांच्या या चित्रपटाचे पोस्टर जुलैमध्ये पहिल्यांदा पोस्ट करण्यात आले होते. या चित्रपटाच्या पोस्टरने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली होती. वाचा: कंगना,पी व्ही सिंधूसह 119 मान्यवरांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान यामध्ये चित्रपटातील तिन्ही कलाकार इंटेस लुकमध्ये दिसले होते. राज कमल फिल्म इंटरनॅशनलच्या बॅनरखाली त्याची निर्मिती झाली होती. यामध्ये विजय सेतुपती आणि फहद फासिल खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
  Published by:News18 Trending Desk
  First published: