• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • Padma Awards: कंगना, पी व्ही सिंधूसह 119 मान्यवरांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान

Padma Awards: कंगना, पी व्ही सिंधूसह 119 मान्यवरांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान

Kangana Ranaut

Kangana Ranaut

राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ram Nath Kovind ) यांच्या हस्ते 119 मान्यवरांना पद्म पुरस्कार (PadmaAwards2020 )देऊन गौरवण्यात आले आहे. हा वितरण सोहळा आज राष्ट्रपती भवनात पार पडला.

 • Share this:
  नवी दिल्ली, 8 नोव्हेंबर: राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ram Nath Kovind) यांच्या हस्ते 119 मान्यवरांना पद्म पुरस्कार (PadmaAwards2020) देऊन गौरवण्यात आले आहे. हा वितरण सोहळा आज राष्ट्रपती भवनात पार पडला. 7 मान्यवरांना पद्म विभूषण, 10 जणांना पद्म भूषण आणि 102 मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे. पद्म पुरस्कारांनी सन्मानित होणाऱ्या मान्यवरांमध्ये 29 महिलांचा समावेश आहे. तर 16 मान्यवरांना मरणोपरांत पद्म पुरस्कार देण्यात आला आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रसिद्ध गायक अदनान सामी, अभिनेत्री कंगना राणावत यांना पद्मश्री तर मेरी कोम यांना पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. कंगनाने यासंदर्भात व्हि़डीओ शेअर करत सर्वांचे आभार मानले आहेत. तसेच, जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या कार्यकाळात भारत-जपान संबंधांत बरीच प्रगती झाली. सार्वजनिक सेवेसाठी त्यांना पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले आहे. Image

  2020साठी या मान्यवरांना पद्म विभूषण पुरस्कार

  जॉर्ज फर्नांडिस (मरणोपरांत) अरुण जेटली (मरणोपरांत) सुषमा स्वराज (मरणोपरांत) मॉरिशसचे माजी राष्ट्रपती आणि माजी पंतप्रधान अनिरुद्ध जगन्नाथ (मरणोपरांत) उत्तर प्रदेशातील पंडित छन्नूलाल मिश्र मेरी कौम बॅडमिंटन खेळाडू पी व्ही सिंधु पेजावर मठाचे श्री विश्वेशतीर्थ स्वामी (मरणोपरांत)

  2021साठी पद्म विभूषण

  जापानचे माजी पंतप्रधान शिंजो अबे गायक एसपी बालासुब्रमण्यम (मरणोपरांत) मौलाना वहीद्दीन खान डॉ. बेला मोन्नपा हेगड बीबी लाल नरिंदर सिंह कपानी सुदर्शन साहो

  पद्म भूषण

  कृष्णन नायर शांतकुमारी (कला, केरळ) तरुण गोगोई ( मरणोपरांत) चंद्रशेखर कंबरा (साहित्य, कर्नाटक) सुमित्रा महाजन नृपेंद्र मिश्र (नागरी सेवा) रामविलास पासवान (मरणोपरांत) केशुभाई पटेल (मरणोपरांत) कल्बे सादिक (मरणोपरांत) रजनीकांत देवीदास (उद्योग, महाराष्ट्र) तरलोचन सिंह

  पद्मश्री

  मृदुला सिन्हा (मरणोपरांत) पीटर ब्रुक (कला) फादर वेल्स (मरणोपरांत) प्रा. चमनलाल सप्रु (मरणोपरांत) अदनान सामी (कला) कंगना राणावत (कला)
  Published by:Dhanshri Otari
  First published: