मुंबई 18 जुलै: गेल्या वर्षभरात मराठी चित्रपट हे केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. तर तेही ओटीटी प्लॅटफॉर्मवर. तर अनेक चित्रपटांचं प्रदर्शन आणि चित्रीकरणही रखडलं होतं. पण एका मराठी चित्रपटाने सध्या जगभरात अनेक पारितोषिकं मिळवली आहे. शेतकरी जीवनावर आधारीत असलेला चित्रपट ‘काळी माती’ (Kali Mati) सध्या सगळीकडे चर्चेचा विषय ठरत आहे. विशेष म्हणजे लॉकडाऊनमध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण पुर्ण करण्यात आलं होतं. शेतकरी जीवनावर आधारीत हा चित्रपट आहे.
HBD Priyanka Chopra: शाळेत वर्णभेदाचा करावा लागला होता सामना; आता ग्लोबल स्टार झाली आहे देसी गर्लएका प्रगतशील शेतकऱ्याची गाथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे. शेतीत संपूर्ण मेहणत आणि घाम गाळून एका शेतकऱ्याने तब्बल 400 कोटींची उलाधाल केली होती. याच सत्य कथेवर आधारीत हा चित्रपट रेखाटण्यात आला आहे. चित्रपटाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभाग घेतला होता आणि अवघ्या 194 दिवसांत 301 पुरस्कार या चित्रपटाने पटकावले आहेत.
Cannes Film Festival 2021: पाहा पुरस्कार विजेत्यांच्या नावाची संपूर्ण यादीयानिमित्त चित्रपटाचे दिग्दर्शक हेमंतकुमार यांनी सांगितले की, “हा चित्रपट राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त प्रगतशील आणि आदर्श शेतकरी ज्ञानेश्वर बोडके यांच्या यशोगाथेवर आधारित असून शेतीसाठी जीव की प्राण मेहनत करून जवळजवळ 400 कोटींची आर्थिक उलाढाल करणाऱ्या शेतकऱ्याची स्फूर्ती आणि प्रेरणादायी कहाणी घराघरात पोहोचावी आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात या उद्देशाने साकारण्यात आला आहे. तसेच शेतकऱ्यांच्या मूलभूत समस्या, बँकांचे आणि सरकारचे शेतकऱ्यांविषयीचे धोरण यावर उत्कट भाष्य करणारा हा सिनेमा आहे."
HBD: वडील मंत्री तर आई समाजसेविका, तरीही संघर्षात गेलं भूमी पेडणेकरचं बालपणतब्बल 61 पारितोषिके दिग्दर्शक हेमंतकुमार महाले यांना दिग्दर्शनासाठी मिळाली आहेत. अनेक देशात या चित्रपटाने ठसा उमटवला आहे. भारत, सिंगापूर, मलेशिया, फ्रान्स, युरोप, लंडन, अमेरिका या देशांत पुरस्कार मिळाले आहेत. चित्रपटात ओमप्रकाश शिंदे, एतशा संझगिरी, दीक्षा भोर, भगवान पाचोरे, पूनम पाटील, पी. के. वाघमारे या कलाकारांनी काम केलं आहे.