मुंबई 18 जुलै: गेले काही दिवस कान पुरस्कार सोहळ्याची (Cannes Film Festival 2021) चर्चा आहे. काही दिवस चाललेला हा सोहळा आता संपला आहे. तर विजेत्यांनी आपल्या नावावर पुरस्कार केला आहे. अनेक सेलिब्रिटींना या सोहळ्याला हजेरी लावली होती. अनेक भाषांचे आणि देशांच्या चित्रपट यात सहभागी होते.
काही चित्रपटांनी विशेष बाजी मारल्याचं पाहायला मिळालं. जुलिया डिकोर्नचा (Julia Ducournau) ऐतिहासिक विजय पाहायला मिळाला . तिला तिच्या ‘तितेन’ (Titane) या चित्रपटासाठी Palme d’Or हा पुरस्कार मिळाला. हा तिने मिळवलेल्या दुसऱ्या महिला दिग्दर्शकाचा पुसरस्कार आहे. याआधी 1993 मध्ये जेन कॅम्पियनने Jane Campion हा पुरस्कार जिंकला होता.
HBD Priyanka Chopra: शाळेत वर्णभेदाचा करावा लागला होता सामना; आता ग्लोबल स्टार झाली आहे देसी गर्ल
पाहा संपूर्ण विजेत्यांची यादी,
Palme d'Or: जुलिया डिकॉर्नला (Julia Ducournau) ‘तितेन’ (Titane) या फ्रान्सच्या (France) चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळाला.
Grand Prix: हा पुरस्कार विभागून देण्यात आला. अश्गर फर्हादीला Ashgar Farhadi ‘ए हिरो’ (A Hero) (Iran) आणि (Finland) फाइनलँडच्या जुहोला (Juho Kuosmanen) ‘कंम्पार्टमेंट नंबर ६’ (Compartment No.6) या चित्रपटांना मिळाला.
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (Best director): Leos Carax "Annette" (France)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (Best actress): Renate Reinsve "Worst Person in the World" (Norway)
सर्वोत्कृष्ट अभिनेता Best actor: Caleb Landry Jones for "Nitram" (US)
सर्वोत्कृष्ट पटकथा (Best screenplay): Hamaguchi Ryusuke and Takamasa Oe for "Drive My Car" (Japan)
जुरी पारितोषिक (Jury prize): विभागून Nadav Lapid ला "Ahed's Knee" (Israel) आणि Apichatpong Weerasethakul ला "Memoria" (Thailand)
पहिला सर्वोत्कृष्ट चित्रपट (Best first film): Antoneta Kusijanovic for "Murina" (Croatia)
सर्वोत्कृष्ट लघुपट (Best short film): Hong Kong's "All The Crows In The World" Tang Yi
दरम्यान मागील वर्षी हा सोहळा रद्द करावा लागला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा झाला नव्हता. तर यावर्षी पुन्हा एकदा हा दिमाखदार सोहळा पार पडला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Film, Oscar award