मुंबई, 09 जुलै : बॉलिवूड अभिनेत्री काजोल सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. काजोल आता ‘द ट्रायल’ या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. ‘द ट्रायल’च्या प्रमोशनदरम्यान केलेल्या एका वक्तव्यामुळे ती सध्या चर्चेत आहे. काजोलने अलीकडेच देशातील ‘अशिक्षित राजकारण्यां’बद्दल भाष्य केले आहे. तिच्या या मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. अखेर आता या वक्तवयावर काजोलनं एक ट्विट करत स्पष्टीकरण दिलं आहे. काय म्हणाली ती जाणून घ्या. क्विंट’ ला दिलेल्या या मुलाखतीत काजोलने मोठं वक्तव्य केलं आहे. या मुलाखतीत काजोल म्हणाली, ‘‘आपल्याकडे अशिक्षित राजकारणी ज्यांना विकास कसा करायचा ते माहित नसतं असे लोक आपल्यावर राज्य करतात. ’’ काजोल पुढे म्हणाली, “भारतासारख्या देशात बदल खूप मंदपणे होत आहे. आपण आपल्या परंपरांमध्ये अडकलो आहोत आणि त्याचा संबंध शिक्षणाशी आहे. आपल्यावर असे राजकीय नेते राज्य करतात ज्यांना काहीही शैक्षणिक पार्श्वभूमी नाही. माझ्या मते शिक्षणामुळे तुम्हाला वेगळ्या दृष्टिकोनातुन पाहण्याची संधी मिळते.’’ आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी अभिनेत्रीला ट्रोल करताना दिसत आहेत. या वक्तव्यावर काजोलनं स्पष्टीकरण दिलं आहे.
काजोलने ट्विट करत म्हटलं की, ‘मी फक्त शिक्षण आणि त्याचे महत्त्व यावर बोलत होते. माझा उद्देश कोणत्याही राजकीय नेत्याला बदनाम करण्याचा नव्हता, आपल्याकडे काही महान नेते आहेत जे देशाला योग्य मार्गावर घेऊन जात आहेत.’ असं स्पष्टीकरण तिनं दिलं आहे. तिच्या या वक्तव्यावर नेटकऱ्यांकडून जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक नेटकरी तिला “काजोल तूच अभिनयासाठी शिक्षण सोडून दिलंस आणि आता अशिक्षित राजकारण्याविषयी बोलतेस’ असं म्हणत तिला ट्रोल केलं आहे. Karan Johar: ‘तू गे आहेस का?’ चाहत्याने विचारलेल्या त्या प्रश्नावर करण जोहरच थेट उत्तर; म्हणाला ‘तूला पण..’ दरम्यान, काजोल ‘द ट्रायल’ या वेब सीरिजद्वारे ओटीटीमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. काजोलची लोकप्रिय वेब सिरीज ‘द ट्रायल’ 14 जुलै 2023 रोजी रिलीज होणार आहे. ही वेब सिरीज OTT प्लॅटफॉर्म Disney Plus Hotstar वर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. ‘ट्रायल’ ही वेब सिरीज अमेरिकन मालिका ‘द गुड वाईफ’चा हिंदी रिमेक आहे. काजोलशिवाय ‘द ट्रायल’मध्ये जिशू सेनगुप्ता, एली खान, शीबा चड्ढा आणि कुब्बरा सैत यांच्याही भूमिका आहेत.
I was merely making a point about education and its importance. My intention was not to demean any political leaders, we have some great leaders who are guiding the country on the right path.
— Kajol (@itsKajolD) July 8, 2023
काजोल या वेब सिरीजमध्ये एका वकिलाची भूमिका साकारणार असून तिला या वेगळ्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. पण आता त्याचबरोबर या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान दिलेल्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे ती चर्चेचा विषय बनली आहे.