.मुंबई, 09 जुलै : बॉलिवूडचा प्रसिद्ध फिल्ममेकर करण जोहर हा कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. नुकताच त्याने बॉलिवूडमध्ये २५ वर्ष पूर्ण केले आहेत. आता या खास वर्षी करण जोहरने दिग्दर्शित केलेला एक खास चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. रणवीर सिंग आणि आलिया भट्ट स्टारर ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पण त्याआधी आता करण जोहर चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर त्याने चाहत्याला दिलेल्या एका उत्तराची तुफान चर्चा होते आहे. आजवर अनेक सेलिब्रिटींनी आपण समलैंगिक असल्याचे उघडपणे मान्य केले आहे, तर बॉलीवूडमधील काही सेलिब्रिटी समलिंगी असल्याचे सांगितले जाते, परंतु त्यांनी ते कधीच उघडपणे स्वीकारले नाही. चित्रपट निर्माता करण जोहर देखील त्यापैकी एक आहे. त्याच्या लैंगिकतेवर नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आहे. आता पुन्हा तेच घडलं आहे. संजीव कुमारांना आधीच आली होती मृत्यूची कल्पना; ‘या’ कारणामुळे घेतला आयुष्यभर एकटंच राहण्याचा निर्णय नुकतंच करण जोहरने थ्रेड्स या नव्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ‘आस्क करण एनीथिंग’ हे सेशन आयोजित केले होते. तेव्हा एका वापरकर्त्याने करणला ‘तू गे आहे का?’ असं विचारलं. त्यावर करणने दिलेल्या उत्तराची चर्चा रंगी आहे. या प्रश्नाचे उत्तर देण्यासोबतच करणने त्याला आयुष्यात सर्वात जास्त कशाचा पश्चाताप होतो हे देखील सांगितले.
एका यूजरने करण जोहरला, ‘तू समलिंगी आहेस का?’ विचारताच करणने मजेशीरपणे उत्तर दिले. करणने त्यालाच उलट, ‘तुला त्यात इंटरेस्ट आहे का?’ असा प्रश्न विचारला. यानंतर आणखी एका युजरने करण जोहरला विचारले की, ‘तुम्हाला कशाचा सर्वात जास्त पश्चाताप होतो?’ त्यावर त्याने ‘मला माझी आवडती अभिनेत्री श्रीदेवीसोबत काम करण्याची आणि तिचे दिग्दर्शन करण्याची संधी मिळाली नाही.’ असं उत्तर दिलं. करणने दिलेल्या या उत्तरांची आता चर्चा होत आहे. करणचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट 28 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाद्वारे करण जोहर 6 वर्षांनंतर दिग्दर्शनात पुनरागमन करत आहे. या चित्रपटात आलिया भट्ट, रणवीर सिंग, जया बच्चन, धर्मेंद्र, शबाना आझमी आणि इतर कलाकार आहेत. यात वरुण धवन, सारा अली खान आणि अनन्या पांडे यांचाही कॅमिओ असल्याचं म्हटलं जात आहे.करण जोहरच्या या चित्रपटाकडून सगळ्यांनाच खूप अपेक्षा आहेत.