जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Kailash Kher: धक्कादायक! प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांच्यावर हल्ला; अशी घडली घटना

Kailash Kher: धक्कादायक! प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांच्यावर हल्ला; अशी घडली घटना

कैलाश खेर

कैलाश खेर

आपल्या आवाजामुळे आणि वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे कैलाश खेर आज वेगळ्याच कारणाने प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. कर्नाटकमध्ये एका कॉन्सर्टदरम्यान कैलाश खेर यांच्यावर हल्ला झाला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 30 जानेवारी : प्रसिद्ध गायक कैलाश खेर हे भारतीय संगीतातील एक लोकप्रिय नाव आहे. त्यांच्या आवाजाची जादू देशभरातील श्रोत्यांच्या मनावर आहे. एवढेच नाही तर बॉलिवूडमध्येही त्यांनी मोठं नाव कमावलं. त्यांची अनेक गाणी अजरामर आहेत आणि त्यांचा आवाज श्रोत्यांच्या काळजात ठसणारा आहे. आपल्या आवाजामुळे आणि वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे कैलाश खेर आज वेगळ्याच कारणाने प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. कर्नाटकमध्ये एका कॉन्सर्टदरम्यान कैलाश खेर यांच्यावर हल्ला झाला आहे. कैलाश खेर स्टेजवर परफॉर्म करत असतांना त्याच्यावर काही तरुणांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. बातम्यांनुसार, गायक कैलाश खेर यांच्यावर कर्नाटकात एका कॉन्सर्टदरम्यान जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. वृत्तानुसार, कॉन्सर्टदरम्यान गायकावर बाटली फेकण्यात आली आहे. अशा परिस्थितीत तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी तातडीने कारवाई करत कैलास खेर यांच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला अटक केली. मात्र, गायकाच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. हेही वाचा - Gandhi Godse Ek Yudh Collection: ‘पठाण’ च्या धमाक्यात ‘गांधी गोडसे’ ची काय स्थिती? एकूण कमाई वाचून व्हाल हैराण कर्नाटकातील हंपी शहरात कैलाश खेर यांच्या मैफिलीत प्रचंड गर्दी जमली होती. कर्नाटकातील हंपी महोत्सवादरम्यान गायक कैलाश खेर यांच्यावर पाण्याची बाटली फेकण्यात आली . कैलाश खेर स्टेजवर परफॉर्म करत असतानाच दोन तरुणांनी त्यांना कन्नड गाणं गाण्याचा आग्रह केला होता. रविवार संध्याकाळी ही घटना घडली आहे. दरम्यान पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.

जाहिरात

रिपोर्ट्सनुसार, कैलाश खेर हंपी फेस्टिव्हलमध्ये गाणे गात होते. दरम्यान, या कॉन्सर्टमध्ये सहभागी झालेल्या दोन मुलांनी कन्नड गाण्याची मागणी करण्यास सुरुवात केली. हे प्रकरण हाताबाहेर गेलं आणि यानंतर त्यांनी स्टेजवर परफॉर्म करत असलेल्या कैलासवर पाण्याची बाटली फेकली. कैलाश यांच्या आधी या कार्यक्रमात अनेक गायकांनी सादरीकरण केले होते. कन्नड पार्श्वगायक अर्जुन, विजय प्रकाश, रघु दीक्षित आणि अनन्या भट. याशिवाय बॉलिवूडमधून अरमान मलिक आणि कैलाश खेर यांनी हजेरी लावली होती. याच कार्यक्रमात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

News18लोकमत
News18लोकमत

कैलाश खेर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हंपी तील या कार्यक्रमाची माहिती दिली होती. रविवारी कैलाश खेर यांनी ट्विट करून लिहिले की, ‘भारतातील प्राचीन शहर, काळ खंड, मंदिर आणि पोटमाळा, हम्पीच्या रूपात समाविष्ट केले जात आहे. कैलास बँडचा शिवनाद आज हंपी महोत्सवात गुंजणार आहे.’’ पण आता त्यांच्याविषयी ही मोठी बातमी समोर आली आहे. कैलास खेर यांचे चाहते काहीसे काळजीत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात