Gandhi Godse Ek Yudh Collection: 'पठाण' च्या धमाक्यात 'गांधी गोडसे' ची काय स्थिती? एकूण कमाई वाचून व्हाल हैराण
शाहरुख खानच्या पठाण सोबतच 26 जानेवारी रोजी बाॅलिवूडमधील बहुचर्चित चित्रपट गांधी गोडसे; एक युद्ध देखील रिलीज झालाय. हा चित्रपट रिलीजच्या अगोदर मोठ्या वादात अडकला होता. या चित्रपटाकडून निर्मात्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. पठाणच्या धमाक्यात या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केलीये जाणून घ्या.
शाहरुख खानचा पठाण बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे.
2/ 8
पठाण चित्रपटाने जगभरात चार दिवसातच तब्बल चारशे कोटींचा टप्पा पार केला आहे. तर भारतात या चित्रपटाचे एकूण कलेक्शन 282 कोटींवर गेले आहे.
3/ 8
शाहरुख खानच्या पठाण सोबतच 26 जानेवारी रोजी बाॅलिवूडमधील बहुचर्चित चित्रपट गांधी गोडसे; एक युद्ध देखील रिलीज झालाय.
4/ 8
मात्र पठाण मुळे या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. शाहरुख खानच्या पठाण चित्रपटामुळे गांधी गोडसे या चित्रपटाची चर्चा देखील होत नाहीये.
5/ 8
'पठाण'सोबत चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेला दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांचा 'गांधी गोडसे: एक युद्ध' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही.
6/ 8
दोन विचारधारा रुपेरी पडद्यावर आणणाऱ्या या चित्रपटाचे कलेक्शन दिवसेंदिवस घसरताना दिसत आहे. रविवारी या चित्रपटाने अवघ्या 16 लाखांचा व्यवसाय केला.
7/ 8
रिपोर्टनुसार गांधी गोडसे: एक युद्ध या चित्रपटाचे बजेट 45 कोटी आहे. मात्र, चित्रपटाची ओपनिंग फारच निराशाजनक राहिली. गांधी गोडसे या चित्रपटाने पहिल्या दिवशी 80 लाखांची कमाई बाॅक्स आॅफिसवर केली.
8/ 8
'गांधी गोडसे: एक युद्ध' चित्रपटाने दुसऱ्या दिवशी ३४ लाखाची कमाई केली. मुळात म्हणजे गांधी गोडसे: एक युद्ध या चित्रपटाची प्रचंड चर्चा होती. परंतू पठाण चित्रपटाची चाहत्यांमध्ये क्रेझ असल्याने प्रेक्षकांनी पठाण चित्रपट पाहण्यावर अधिक भर दिला.