जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / दीपिकासोबत समलैंगिक रिलेशनशिपमध्ये राहायचंय, ‘या’ अभिनेत्रीचा अजब खुलासा

दीपिकासोबत समलैंगिक रिलेशनशिपमध्ये राहायचंय, ‘या’ अभिनेत्रीचा अजब खुलासा

दीपिकासोबत समलैंगिक रिलेशनशिपमध्ये राहायचंय, ‘या’ अभिनेत्रीचा अजब खुलासा

kabir singh या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीनं दीपिकासोबत समलैंगिक रिलेशनशिपमध्ये राहायची इच्छा व्यक्त केल्यानं सध्या दीपिका खूप चर्चेत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 22 जून : अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या तिचा आगामी सिनेमा ‘83’च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या सिनेमामध्ये रणवीर सिंह मुख्य भूमिकेत असून तो माजी क्रिकेटर कपिल देव यांची व्यक्तिरेखा साकारत आहे. तर दीपिका त्याच्या ऑनस्क्रीन पत्नीची म्हणजेच कपिल देव यांची पत्नी रोमी भाटिया यांची भूमिका साकारत आहे. मात्र सध्या ती एका वेगळ्याच कारणानं चर्चेत आली आहे. याच कारण बॉलिवूडमधील एक अभिनेत्री आहे. या अभिनेत्रीनं दीपिकासंबंधी एक आगळीवेगळी इच्छा व्यक्त केली आहे जी ऐकून दीपिकासोबत रणवीरचे चाहतेही अवाक झाले आहेत. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीनं चक्क दीपिकासोबत समलैंगिक रिलेशिपमध्ये राहायचं असल्यांची इच्छा व्यक्त केली आहे. …म्हणून सनी देओल 16 वर्ष शाहरुख खानशी बोलत नव्हता

जाहिरात

‘कबीर सिंह’ सिनेमामुळे चर्चेत असलेली अभिनेत्री कियारा अडवाणीनं ही आगळी वेगळी इच्छा व्यक्त केली आहे. नुकत्याचं दिलेल्या एका मुलाखतीत कियारानं तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले. यावेळी तिला तिच्या रिलेशनशिप बाबत काही प्रश्न विचारण्यात आले आणि तिनं त्याची मनमोकळेपणानं उत्तरं दिली. शेवटी झालेल्या रॅपिड फायर राउंडमध्ये तिला समलैंगिक रिलेशिप कोणासोबत ठेवावीशी वाटते असा प्रश्न विचारण्यात आला होता त्याचं उत्तर देताना कियारानं दीपिका पदुकोणचं नाव घेतलं. तर तिच्या फिल्मी करिअर मधून एखादा सिनेमा कमी करायचा असल्यास तो कोणता असेल तर यासाठी तिनं ‘शानदार’चं नाव घेतलं. सारा-कार्तिकमध्ये नक्की चाललंय तरी काय? मुंबई एअरपोर्टवर पुन्हा दिसले एकत्र

सध्या कियारा अडवाणी ‘कबीर सिंह’ सिनेमात शाहिद कपूरसोबत किसींग सीन दिल्यानं खूप चर्चेत आहे. याआधी तिनं ‘एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या सिनेमात साक्षी धोनीची भूमिका साकारली होती. त्यानंतर तिनं लस्ट स्टोरी या वोब सीरिज मध्येही काम केलं ज्यातील तिच्या भूमिकेचं खूप कौतुक झालं होतं. या वेब सीरिजमधील तिचा व्हायब्रेटर सीन विशेष गाजला होता. काही दिवसांपूर्वी कबीर सिंगच्या साँगच्या लाँचिंगमध्ये शाहिद कपूरनं कियारा सिंगल असल्याचा खुलासा केला होता. पण त्यानंतर कियारानं समलैंगिक रिलेशनशिपविषयी केलेल्या या खुलाशानंतर दीपिकाचा पती रणवीरची प्रतिक्रिया काय असेल याची सर्वांना उत्सुकता आहे. बिपाशाच्या बोल्ड फोटोवर रणवीरची अशी कमेंट, दीपिकानं स्वप्नातही केला नसेल विचार

जाहिरात

====================================================== रेल्वे कर्मचाऱ्याला WWE स्टाईलने चोपला, VIDEO व्हायरल

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात