मुंबई, 21 जून : अभिनेत्री बिपाशा बसू बॉलिवूडमधील सर्वात बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. सध्य मोठ्या पडद्यावरून गायब असलेली बिपाशा सोशल मीडियावर मात्र सातत्यानं सक्रिय आहे. ती नेहमीच तिचे लेटेस्ट फोटो आणि फिटनेस व्हिडिओ तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत असते. नुकताच तिनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक बोल्ड फोटो शेअर केला होता जो सोशल मीडियावर खूप चर्चेचा विषय ठरत आहे.
फिटनेस ऑयकॉन असलेल्या बिपाशाचे इन्स्टाग्रामवर जळपास 6 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. तिनं काही दिवसांपूर्वी एक बोल्ड फोटो शेअर केला होता. ज्यात तिचा फिटनेस दिसत आहे. हा फोटो शेअर करताना बिपाशानं, ‘पुन्हा एकदा या ठिकाणी पोहोचण्यासाठी स्वतःला रीसेट करत आहे. असं कॅप्शन दिलं आहे.’ यावरून लक्षात येत की बिपाशाचा हा फोटो खूप जुना आहे. मात्र हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होण्याचं कारण मात्र वेगळंच आहे. या टीव्ही अभिनेत्रीला करावा लागला लाजिरवाण्या क्षणाचा सामना, ऐनवेळी ड्रेसने दिला
बिपाशानं हा फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केल्यानंतर सर्वांनीच तिचं कौतुक करायला सुरूवात केली आणि विशेष म्हणजे या सर्वांमध्ये बॉलिवूडची मस्तानी दीपिकाचा पती रणवीर सिंहचाही सामावेश आहे. रणवीरनं बिपाशाच्या फोटोवर अशी काही कमेंट केली की ज्याचा दीपिकानं कधी स्वप्नातही विचार केला नसेल. रणवीरनं लिहिलं, ‘किलिंग इट बी’ त्यामुळे रणवीरच्या या कमेंटवर दीपिकाची प्रतिक्रिया काय असणार याची सर्वांना उत्सुकता आहे.
ब्राह्मणांच्या बदनामीने करणी सेना आक्रमक, ‘आर्टिकल 15’ पडद्यावर दिसणार नाही?
बिपाशाच्या या फोटोवर रणवीर व्यतिरिक्त मलायका अरोरानंही कमेंट केली आहे. तिनं कमेंट करताना फायर इमोजी टाकला. तर सोफी चौधरीनं लिहिलं, तू अशी व्यक्ती आहेस जी प्रत्येक व्यक्तीसाठी अशाप्रकारचा स्टॅन्डर्ड सेट करू शकते. सुपर इन्स्पायरिंग. मात्र रणवीरच्या अशा कमेंटनं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
‘या’ कारणासाठी जान्हवी कपूर स्वतःला मानते अंधश्रद्धाळू
================================================== VIDEO : बिचुकले पुन्हा जाणार का बिग बाॅसच्या घरात? सई आणि मेघाचा खुलासा