मुंबई, 22 जून : बॉलिवूडमधील बहुचर्चित जोडी सारा अली खान आणि कार्तिक आर्यन सध्या त्यांचा आगामी सिनेमा लव्ह आज कल 2मुळे चर्चेत आहेत. या सिनेमाच्या निमित्तानं म्हणा किंवा अन्य कारणानं म्हणा ते नेहमीच एकत्र दिसतात. अशातच सारानं करण जोहरच्या चॅट शोमध्ये कार्तिकला डेट करायची इच्छा बोलून दाखवल्यानंतर या दोघांच्या नावाची चर्चा जरा जास्तच व्हायला लागली. काही दिवसांपूर्वी हे दोघंही एकत्र डे आउटला जाताना दिसले होते. त्यानंतर आता त्यांना पुन्हा एकदा मुंबई एअरपोर्टवर एकत्र स्पॉट केलं गेलं. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
या टीव्ही अभिनेत्रीला करावा लागला लाजिरवाण्या क्षणाचा सामना, ऐनवेळी ड्रेसने दिला
सारा आणि कार्तिक सध्या त्यांच्या आगामी सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत. या सिनेमाच्या काही भागांचं शूटिंग दिल्लीमध्ये झालं असून यावेळीही एकत्र फिरतानाचा सारा कार्तिकचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर आता या सिनेमाच्या उर्वरित शूटिंगसाठी जात असताना सारा आणि कार्तिकला मुंबई एअरपोर्टवर एकत्र स्पॉट केलं गेलं. यावेळचा त्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये हे दोघंही खूप खुश दिसत असून एकंदर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहता ते दोघंही एकमेकांसोबत राहणं खूप पसंत करत असल्याचं लक्षात येतं.
'अभिजीत बिचुकले मनोरुग्ण, त्याला चपलेने हाणला पाहिजे'
यावेळी कार्तिक नेहमी प्रमाणे कॅज्युअल लुकमध्ये दिसला तर सारा देसी लुकमध्ये स्पॉट झाली तिनं व्हाइट कलरचा सूट घातला होता आणि त्यावर रंगीबेरंगी ओढणी घेतली होती. हा सूट तिच्यावर खूपच खुलून दिसत होता. आगामी सिनेमा ‘लव्ह आज कल’च्या सिक्वेलमध्ये कार्तिक आणि साराची रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. तसेच यामध्ये त्या दोघांचे वेगवेगळे लुक पाहायला मिळणार आहेत. या सिनेमाच्या निमित्तानं सारा आणि कार्तिकमध्ये जवळीक वाढत असली तरीही त्यांच्या लिंक अपच्या चर्चांवर साराची आई अमृता सिंग मात्र नाराज आहे.
योग करण्याचा मोह इनायाला आवरेना, पाहा सोहा अली खानच्या लेकीचे फोटो
====================================================
VIDEO : बिचुकले पुन्हा जाणार का बिग बाॅसच्या घरात? सई आणि मेघाचा खुलासा