मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

ओळखा पाहू आई-बाबांसोबत ही चुमकली आहे कोण? आज आहे मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री

ओळखा पाहू आई-बाबांसोबत ही चुमकली आहे कोण? आज आहे मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री

 तेजश्री प्रधान(Tejashri Pradhan) असं या लाडक्या अभिनेत्रीचं नाव आहे. तेजश्रीने अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांनामधून आपला ठसा उमठवला आहे

तेजश्री प्रधान(Tejashri Pradhan) असं या लाडक्या अभिनेत्रीचं नाव आहे. तेजश्रीने अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांनामधून आपला ठसा उमठवला आहे

तेजश्री प्रधान(Tejashri Pradhan) असं या लाडक्या अभिनेत्रीचं नाव आहे. तेजश्रीने अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांनामधून आपला ठसा उमठवला आहे

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 15 मे-  आपण दररोज कलाकारांच्या बालपणीच्या(Childhood Memories) आठवणींना उजाळा देत असतो. आजही अशीच एक अभिनेत्री आपण पाहणार आहोत. ही अभिनेत्री आपल्या हास्याने सर्वांनाचं संमोहित करते. तेजश्री प्रधान(Tejashri Pradhan) असं या लाडक्या अभिनेत्रीचं नाव आहे. तेजश्रीने अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांनामधून आपला ठसा उमठवला आहे. तर हा बालपणीचा फोटो अभिनेत्री तेजश्री प्रधानचाच आहे. या फोटोमध्ये ती आपल्या आई बाबांसोबत दिसून येत आहे. यामध्ये तेजश्री खुपचं गोड दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by (@tejashripradhan)

काही दिवसांपूर्वी तेजश्रीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपला हा गोंडस फोटो शेयर केला होता. या फोटोमध्ये तेजश्री आईने तिला उचलून घेतलं आहे. तर त्यांच्यासोबत तिचे बाबासुद्धा उभे आहेत. लहान तेजूच्या चेहऱ्यावर अतिशय गोड असं हास्य सुद्धा आहे. हा फोटो चाहत्यांना मोठ्या प्रमाणात पसंत सुद्धा पडला होता. यावर अनेक चाहत्यांनी कमेंट्स सुद्धा दिलेल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by (@tejashripradhan)

तेजश्री प्रधान मराठी सृष्टीतील एक उत्तम अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. मूळच्या डोंबिवलीच्या असणाऱ्या तेजश्रीने ‘या गोजिरवाण्या घरात’ या मालिकेमधून अभिनय क्षेत्रात प्रवेश केला होता. मात्र तिला अफाट प्रसिद्धी मिळाली ती ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेमुळे. ही मालिका अतिशय लोकप्रिय ठरली होती. यातील श्री आणि जान्हवी ही जोडी प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरली होती.

(हे वाचा:ती सध्या काय करतेय? बॉलिवूडमधून अचानक गायब झाली होती ट्विंकल खन्नाची बहिण)

या मालिकेनंतर श्री आणि जान्हवी म्हणजेच अभिनेता शशांक केतकर आणि तेजश्री प्रधानने लग्न सुद्धा केल होतं. मात्र एका वर्षातचं त्यांचा घटस्फोटदेखील झाला होता. त्यांनतर शशांकने दुसर लग्न केलं होतं. मात्र तेजश्रीने अजूनही दुसर लग्न केलेलं नाही.

(हे वाचा: HBD Special: या अभिनेत्रीच्या नकारामुळं Madhuri Dixit झाली ‘धक धक गर्ल’)

तेजश्रीने मालीकंना सोबतचं मराठी चित्रपटांमध्ये सुद्धा काम केलं आहे. ‘ती सध्या काय करते’ हा चित्रपट अतिशय लोकप्रिय ठरला होता. यामध्ये तेजश्री अंकुश चौधरीसोबत झळकली होती. तर अभिनय बेर्डे आणि आर्या आंबेकर यांनी त्यांच्या बालपणाची भूमिका साकारली होती.

First published:

Tags: Instagram post, Marathi actress, Marathi entertainment