सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी, फेसबुक पोस्ट झाली VIRAL

सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी, फेसबुक पोस्ट झाली VIRAL

काळवीट हरणाची शिकार केल्या प्रकरणी सलमान खानच्या अपीलवर येत्या 27 सप्टेंबरला जोधपूरमध्ये सुनावणी होणार आहे.

  • Share this:

मुंबई, 25 सप्टेंबर : काळवीट शिकार प्रकरणी बॉलिवूड अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. आधी जोधपूर पोलिसांच्या समोरच सलमान जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर आता सोशल मीडियाच्य माध्यमातून त्याला पुन्हा एका जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ही धमकी, स्टुडंट ऑर्गनायझेशन ऑफ पंजाब यूनिव्हर्सिटीचा ग्रुप 'सोपू' कडून देण्यात आली आहे. सध्या सोशल मीडियावर 'सोपू'च्या धमकीची ही पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. त्यानंतर आता पोलिसांकडून याप्रकरणी तपास सुरू करण्यात आला आहे. काळवीट हरणाची शिकार केल्या प्रकरणी सलमान खानच्या अपीलवर येत्या 27 सप्टेंबरला जोधपूरमध्ये सुनावणी होणार आहे.

'सोपू'च्या न्यायालयात तू दोषी आहेस सलमान

'सोपू'च्या फेसबुक पेजवर गॅरी शूटर नावाच्या एका तरुणानं सलमान खानच्या पोटोवर लाल क्रॉस मार्क करत लिहिलं, 'सलमान तू विचार कर, तू देशाच्या न्यायालयात वाचशील मात्र बिश्नोई समाजाच्या आणि सोपू पार्टीच्या कायद्यानं तुला मृत्यूदंडाची सजा सुनावली आहे. सोपूच्या न्यायालयात तू नेहमीच दोषी आहेस. सलाम शहीदा नूं' ही फेसबुक पोस्ट सोशल मीडियावर सगळीकडे व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी तपासाला सुरुवात केली आहे.

मलायका अरोरानं पूर्ण केलं #MakeYourMoov चॅलेंज, अर्जुन कपूरला केलं टॅग

डीसीपी धर्मेंद्र यांदव यांनी सांगितलं, पोलिस कोणत्याही सेलिब्रेटीला न्यालायात हजर करत असताना संपूर्ण सुरक्षा पुरवते आणि त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारची इजा किंवा नुकसान होणार नाही याची काळजी घेतात. मागच्या बऱ्याच काळापासून काळवीट हरणाच्या शिकार प्रकरणी सोपू गँग कडून सलमानला जीवे मारण्याची धमकी सतत दिली जात आहे.

#Ageism : बॉलिवूडमध्ये आता नवा वाद, नीना गुप्ता यांनी उठवला आवाज

स्थानिक गुंड लॉरेन्स बिश्नोईनं दिली होती धमकी

उल्लेखनीय बाब अशी की, याआधी स्थानिक गुंड लॉरेन्स बिश्नोईनं सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. सलमानला न्यायालयात हजर करत असताना लॉरेन्सनं पोलिसांच्या समोर त्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. मात्र त्यानंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती.

27 सप्टेंबरला न्यायालयात सुनावणी

सीजेएम ग्रामीणनं या अगोदर काळवीट हरणाच्या शिकार प्रकरणी 5 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर सलमाननं याबाबत जिल्हा सत्र न्यायालयात अपील केलं होतं. त्याची सुनावणी येत्या 27 सप्टेंबरला जोधपुर जिल्हा सत्र न्यायालयात हजर केलं जाणार आहे. जर सलमान या सुनावणीसाठी न्यायलयात हजर राहिला नाही तर त्याचा जामीन रद्द केला जाईल.

रानू मंडलवर सलमानची पहिली प्रतिक्रिया, घर दिल्याच्या प्रश्नावर म्हणाला...

==================================================================

VIDEO: आज दिवसभरात घडाणाऱ्या सगळ्यात महत्त्वाच्या टॉप 18 न्यूज, पाहा झटपट

Published by: Megha Jethe
First published: September 25, 2019, 8:47 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading