मुंबई, 24 सप्टेंबर : बॉलिवूडमध्ये मागच्या काही काळापासून नेपोटिझमचा वाद सुरू आहे. अभिनेत्री कंगना रणौतनं अनेकदा याबद्दल आवाज उठवला आहे. मात्र आता वय आणि त्याच्याशी निगडीत भूमिका यावरुन बॉलिवूडमध्ये आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. निमित्त ठरलं ते सांड की आँख या सिनेमाचं. या सिनेमावरुन आता Ageism हा नवा वाद सुरु झाला असून या वादाला सुरुवात झाली ती कंगनाची बहीण रंगोली चंडेल हिच्या ट्वीटमुळे. त्यांनंतर जेष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांनी याविरोधात आवाज उठवला आहे. नीना गुप्ता यांचं ट्वीट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तापसी पन्नू आणि भूमि पेडणेकर यांच्या प्रमुख भूमिका असलेला सिनेमा ‘सांड की आँख’चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. त्यानंतर कंगनाची बहीण रंगोली चंडेल हिनं ट्वीट करत या सिनेमातील भूमिका रम्या कृष्णन आणि नीना गुप्ता किंवा त्याच्या वयातील अभिनेत्रींनी साकरल्या असत्या तर अधिक योग्य होतं असं म्हटलं होतं. तिनं लिहिलं, ‘या सिनेमात कंगनानं काम करावं असं या सिनेमाच्या निर्मात्यांना वाटत होतं मात्र तिनं ही ऑफर नाकारली कारण वयस्कर स्त्रियांची भूमिका असलेल्या या सिनेमात त्याच वयाच्या अभिनेत्रींनी त्या भूमिका साकाराव्यात असं तिला वाटत होतं. यासाठी तिची रम्या कृष्णन आणि नीना गुप्ता यांच्या नावाला पसंती होती.’ Laal Kaptan Trailer: ‘नागा साधूचा खुनी खेळ’, सैफचं अंगावर शहारे आणणारं हिंसक रुप
रंगोली चंडेल हिच्या या ट्वीटनंतर सोशल मीडियावर युजरच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या अनेकांनी रंगोलीच्या या ट्वीटला समर्थन दिलं. त्यानंतर आता अभिनेत्री नीना गुप्ता यांनी सुद्धा त्याच्या ट्विटर अकाउंटवरुन रंगोलीच्या या ट्वीटला संमती दर्शवली आहे. त्यांनी लिहिलं, ‘मी याच्याशी सहमत आहे. कमीत कमी आमच्या वयाच्या भूमिका तरी आम्हाला करु द्यायला हव्यात.’ …अन् चक्क अभिनेत्रीनं घेतली, सलमानच्या मागोमाग आलेल्या कुत्र्याची मुलाखत
Yes i was just thinking about this hamari umar ke role toe kamsekam humse kara lo bhai https://t.co/6Fmrxn0HbE
— Neena Gupta (@Neenagupta001) September 24, 2019
‘सांड की आँख’ या सिनेमात तापसी पन्नू आणि भूमि पेडणेकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या सिनेमात त्या शूटर दादीच्या भूमिकेत दिसणार आहेत. यात त्यांनी वयस्कर महिलांच्या भूमिका साकरल्या आहेत. त्यावरुन हा नवा वाद सुरू झाला आहे. इंडस्ट्रीमध्ये त्या वयाच्या रम्या कृष्णन, नीना गुप्ता किंवा जया बच्चन यांच्यासारख्या अभिनेत्री असतानाही तरुण अभिनेत्रींना या भूमिकांसाठी निवडणं म्हणजे त्याच्या वयावरुन त्यांना वगळल्यासारखं आहे असं सर्वांचं म्हणणं आहे. Bigg Boss 13: पाहा कसं दिसतंय नव्या सीझनचं नवं घर ============================================================ स्मिता गोंदकरने दिली ग्रॅण्ड पार्टी! सेलिब्रिटींची फुल टू धमाल! पाहा VIDEO