मुंबई, 24 सप्टेंबर : मागच्या काही दिवसांपासून देशभरात पंचप्रधान नरेंद्र मोदी यांच्या FitIndiaMovement ची चर्चा आहे. आता यामध्ये बॉलिवूड सेलिब्रेटींनीही उडी घेतली आहे. त्यासाठी बॉलिवूडकरांनी आता एक अनोखं चॅलेंज घेतलं आहे. या चॅलेंजचं नाव आहे #MakeYourMoov चॅलेंज. या अंतर्गत अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी फिटनेससाठी त्यांची सोपी मूव्ह व्हिडीओद्वारे त्यांच्या चाहत्यांशी शेअर करत आहेत. अभिनेत्री मलायका अरोरानं सुद्धा हे चॅलेंज स्विकारलं आहे. बॉलिवूडची फिटनेस क्वीन मलायका अरोरानं तिच्या इन्स्टाग्रामवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती तिची सर्वात सोपी मूव्ह करताना दिसत आहे. जी जीम उपलब्ध नसतानाही कुठेही करता येणं आपल्याला शक्य आहे. मलायकाला हे चॅलेंज तिचा मित्र आणि अभिनेता अर्जुन रामपालनं दिलं असून मलायकानं तिच्या या व्हिडीओमध्ये रोहित शेट्टी, अर्जुन कपूर, हृतिक रोशन, टायगर श्रॉफ, राकुल प्रीत इत्यादी कलाकरांना टॅग केलं आहे. रानू मंडलवर सलमानची पहिली प्रतिक्रिया, घर दिल्याच्या प्रश्नावर म्हणाला…
मलायकाचं हे चॅलेजं राकुल प्रीतनं स्विकारलं असून तिनं लगेचच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला असून यात ती सोफ्याच्या मदतीनं पुशअप्स मारताना दिसत आहे.
मलायका व्यतिरिक्त अभिनेत्री शिल्पा शेट्टी फिट इंडिया चळवळीचा महत्त्वाचा भाग आहे. मलायका नेहमीच तिच्या फिटनेसमुळे चर्चेत असते. वयाच्या 45 व्या वर्षीही तिचा फिटनेस हा तरुण अभिनेत्रींना लाजवेल असाच आहे. मागच्या काही काळापासून ती अभिनेता अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. Laal Kaptan Trailer: ‘नागा साधूचा खुनी खेळ’, सैफचं अंगावर शहारे आणणारं हिंसक रुप ============================================================ स्मिता गोंदकरने दिली ग्रॅण्ड पार्टी! सेलिब्रिटींची फुल टू धमाल! पाहा VIDEO