रानू मंडलवर सलमानची पहिली प्रतिक्रिया, घर दिल्याच्या प्रश्नावर म्हणाला...

मागच्या काही दिवसांपासून सलमान खाननं सोशल मीडिया व्हायरल सिंगर रानू मंडल यांना 55 लाखाचं घर दिल्याच्या म्हटलं जात होतं.

News18 Lokmat | Updated On: Sep 24, 2019 03:28 PM IST

रानू मंडलवर सलमानची पहिली प्रतिक्रिया, घर दिल्याच्या प्रश्नावर म्हणाला...

मुंबई, 24 सप्टेंबर : टीव्हीवरील सर्वाधिक वादग्रस्त रिअलिटी शो बिग बॉसच्या 13 व्या सीझनचं लॉन्चिंग सोमवारी मुंबईतील अंधेरी मेट्रो स्थानकावर थोड्या हटके अंदाजात झालं. यावेळी सलमान मस्तीच्या मूडमध्ये दिसला. ढोल-ताशाच्या तालवर त्यानं धमाकेदार डान्स करत या इव्हेंटमध्ये एंट्री घेतली. यावेळी ,सलमानसोबत अर्जुन बिजलानी, अमिषा पटेल, सना खान, पुजा बॅनर्जी या कलाकरांनी सुद्धा हजेरी लावली होती. यावेळी सलमाननं मीडियाशी सुद्धा बोलला. बिग बॉसशी संबंधित प्रश्नांसोबतच रानू मंडल यांच्याविषयी विचारलेल्या काही प्रश्नांचीही त्यानं यावेळी उत्तरं दिली.

मागच्या काही दिवसांपासून सलमान खाननं सोशल मीडिया व्हायरल सिंगर रानू मंडल यांना 55 लाखाचं घर दिल्याच्या म्हटलं जात होतं. मात्र रानू मंडल यांनी या सर्व केवळ अफवा असल्याचं म्हटलं होतं. याविषयी रानू यांना विचारल असता त्या म्हणाल्या, मला याबाबत काहीही माहित नाही, मला सलमाननं कोणतही घर दिलेलं नाही आणि जर त्यानं असं केलं असतं तर त्यांनं याविषयी स्वतःच सांगितलं असतं किंवा माझी भेट घेतली असती. मात्र असं काहीही झालेलं नाही.

...अन् चक्क अभिनेत्रीनं घेतली, सलमानच्या मागोमाग आलेल्या कुत्र्याची मुलाखत

रानू मंडल यांच्यानंतर स्वतः सलमान खाननं यावर प्रतिक्रिया दिली आहे. बिग बॉस 13च्या लॉन्च इव्हेंटमध्ये सलमान खान पहिल्यांदा रानू मंडल यांच्याविषयी सुरु असलेल्या चर्चांबद्दल बोलला. तु रानू मंडल यांना घर दिलं आहेस का असं विचारल्यावर सलमान खान हसत हसत म्हणला, 'मी असं काहीही केलेलं नाही. माझ्या स्वतःच्याच घराची समस्या आहे. मी स्वतः एका बेडरुमच्या घरात राहत आहे. मी तिला कोणतही घर किंवा कार दिलेली नाही.'

Loading...

Bigg Boss 13: पाहा कसं दिसतंय नव्या सीझनचं नवं घर

सलमान पुढे म्हणाला, 'कुणीतरी मला बर्बाद करण्याचा विचार करत आहे. कोण म्हणतं मी गाडी दिली, कोण म्हणतं घर दिलं गाडी तर आजकाल EMI वर सुद्धा घेता येते. त्यामुळे गाडी ते स्वतः सुद्धा घेऊ शकतात.'सलमानच्या या प्रतिक्रियेनंतर त्यानं रानू यांना घर किंवा गाडी दिलं नसल्याचं सत्य समजल आहे. रानू यांनी हिमेश रेशमियाच्या मदतीनं बॉलिवूडमध्ये प्लेबॅक सिंगर म्हणून पदार्पण केलं आहे. त्यांचं पहिलं गाणं तेरी मेरी कहानी काही दिवसांपूर्वीच रिलीज झालं आहे.

असं काय झालं की, Bigg Boss 13 च्या इव्हेंटमध्ये फोटोग्राफरवर भडकला सलमान

=========================================================

स्मिता गोंदकरने दिली ग्रॅण्ड पार्टी! सेलिब्रिटींची फुल टू धमाल! पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 24, 2019 03:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...