Home /News /entertainment /

'स्त्रीत्वाच्या आड लपून विष ओकनारी प्रवृत्ती ठेचलीच पाहिजे', जितेंद्र आव्हाड संतापले

'स्त्रीत्वाच्या आड लपून विष ओकनारी प्रवृत्ती ठेचलीच पाहिजे', जितेंद्र आव्हाड संतापले

केतकी चितळेने आपल्या फेसबूक अकाऊंटवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केली. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे.

    नितीन नांदुरकर, प्रतिनिधी जळगाव, 14 मे : "राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Sharad Pawar) यांच्यावर अभिनेत्री केतकी चितळेने (Ketki Chitale) केलेली पोस्ट म्हणजे ही विकृत मानसिकता आहे. स्त्रीत्वाच्या आड लपून विष ओकणारी ही प्रवृत्ती आहे. अतिशय गलिच्छ अशी ही विषवल्ली असून ही प्रवृत्ती ठेचलीच पाहिजे. केतकीला धडा शिकवणारच", असं म्हणत मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार यांच्यावर पोस्ट करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेचा कडक शब्दात समाचार घेतला आहे. जळगावातील एका विवाह सोहळ्यासाठी मंत्री जितेंद्र आव्हाड हे उपस्थित होते. यादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. स्त्रित्वाच्या मागे लपून अशा पद्धतीने विष ओकणे हे एका महिलेला शोभत नाही. एखादी स्त्री असं बोलू शकते यावर विश्वासच बसत नाही. किमान तिच्यावर आईवडिलांनी तरी संस्कार करायला हवे होते. ही विचारांची विषवल्ली आहे. महिला असली तरी तिला माफ करण चुकीचे ठरेल. त्यामुळे अभिनेत्री केतकी चितळेला धडा शिकवणार, असं मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले. (आजच्या सभेत उद्धव ठाकरे जनतेच्या मनातील या प्रश्नांची उत्तरे देणार का? नितेश राणेंचा सवाल) केतकी चितळेच्या या पोस्ट मागे कोणाचा काही हात आहे का? याबाबत विचारले असता, यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मनसे अध्यक्ष राज ठाकरे किंवा इतर कुणी असतील, आम्ही त्यांच्यावर बोलतो ते आमच्यावर बोलतात. मात्र इतकं किळसवाणं कुणी बोलत नाही. आम्ही जे बोलतो ते वैचारिक असतं. शरद पवार हे काय व्यक्तिमत्त्व आहे हे केतकी चितळेला काय कळणार? अशी टीका आव्हाडांनी केली. काय आहे प्रकरण? केतकी चितळेने आपल्या फेसबूक अकाऊंटवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केली. या प्रकरणी तिच्या विरोधात कळवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिनेत्री केतकी चितळे हिने आपल्या फेसबूक पोस्टमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत अतिशय खालच्या भाषेत लिहिलं आहे. नितीन भावे नावाच्या व्यक्तीच्या नावाने लिहिलेली ही पोस्ट असल्याचंही तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. ('शरद पवारांसोबत आमचे मतभेद जरुरु, पण विकृतीला वेळीच आवर घाला', राज ठाकरेंकडून निषेध व्यक्त) शरद पवारांवर केलेल्या वादग्रस्त फेसबूक पोस्टनंतर कळवा पोलीस स्टेशनमध्ये तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळवा पोलीस स्टेशनमध्ये 153 ओ आणि 505 अंतर्गतगुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल झाल्याने आता केतकी चितळे अडचणीत आली आहे.

    तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या