मुंबई, 14 मे : मुंबईतील बीकेसी मैदानात आज शिवसेनेची जाहीर सभा (Shiv Sena Rally) होणार आहे. या सभेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) अनेकांच्या तोंडावरचे मास्क उतरवणार असल्याचं खुद्द मुख्यमंत्र्यांनीच काही दिवसांपूर्वी जाहीर केलं होतं. त्यामुळे उद्धव ठाकरे या सभेत नेमकं काय भाष्य करतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मात्र, उद्धव ठाकरेंच्या या सभेपूर्वी भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उद्धव ठाकरेंना चार सवाल केले आहेत. भाजप आमदार नितेश राणे यांनी काही प्रश्न ट्विट केले आहेत. “उद्धव ठाकरे जनतेच्या मनातील खालील प्रश्नांचे उत्तर देणार का? की केंद्रावरच जबाबदारी ढकलणार?आता आम्हाला ‘हे पाहायचंय” असं म्हणत नितेश राणे यांनी चार प्रश्न विचारले आहेत. वाचा : विरोधकांना प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेचा मेगा प्लान, उद्धव ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय काय आहेत नितेश राणेंचे प्रश्न? महाराष्ट्रातील हिंदूंना धमकी देणाऱ्या आणि औरंगजेबाचा उधोउधो करणाऱ्या ओवैसीवर गुन्हे दाखल करून अटक करणार का? महाराष्ट्रात निर्माण झालेला अतिरिक्त ऊसाचं गाळप करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देणार की कारखानदारांचा बचाव करणार?
मा.मु.उद्धव ठाकरे जनतेच्या मनातील खालील प्रश्नांचे उत्तर देणार का? की केंद्रावरच जबाबदारी ढकलणार?आता आम्हाला 'हे पाहायचंच'.@CMOMaharshtra pic.twitter.com/DeqlRyGJHH
— nitesh rane (@NiteshNRane) May 14, 2022
शेतकऱ्यांचा पीक विमा बुडवणाऱ्या पीक वीमा कंपन्यांवर कारवाई करणार का? महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर मेगा नोकर भरतीची घोषणा ही फक्त बेरोजगार युवकांसाठी गाजर होती असे मान्य करणार का? बुस्टर डोस कुणाचा माहिती नाही पण मास्टर ब्लास्टर डोस आमचाच असणार - संजय राऊत संजय राऊत म्हणाले, शिवसेनेची आज होणारी सभा ही आतापर्यंत झालेल्या 100 सभांचा बाप आहे. मुंबईत कोविडच्या काळात इतक्या मोठ्या सभा झाल्या नाहीत. शिवसेनेच्या मुंबईतील सभांची परंपरा विराट अशी आहे. शिवसेना पक्षप्रमुख हे अशा प्रकारच्या जाहीर सभेला संबोधित करतील. या सभेचं व्यासपीठ आपण पाहिलं तर आतापर्यंत इतकं मोठं व्यासपीठ मुंबईत निर्माण झालं नाही. कुणाचा बुस्टर डोस मला माहिती नाही. पण मास्टर ब्लास्टर डोस आमचा असेल. आमची फटकेबाजी असते. आम्ही मास्टर ब्लास्टर आहोत. शिवसेना आणि गर्दी यांचं एक नातं, समीकरण आहे. आम्हाला गर्दी जमवावी लागत नाही. बाळासाहेब ठाकरे यांचा विचार, हिंदुत्वाचा विचार, आमचा मराठी माणसाच्या संदर्भातील विचार हे एक लोहचुंबक आहे यामागे लोक आपोआप जमतात. उद्धव ठाकरेंच्या भाषणाची उत्सुकता महाराष्ट्र आणि देशाला लागलेली आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेल अशी ही सभा असे असंही संज राऊत म्हणाले.