मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /‘पोलिसांनी राईचा पर्वत केला’; अटकेप्रकरणी जिमी शेरगीलनं केले उलट आरोप

‘पोलिसांनी राईचा पर्वत केला’; अटकेप्रकरणी जिमी शेरगीलनं केले उलट आरोप

अखेर या प्रकरणावर त्यानं स्वत: स्पष्टीकरण दिलं. (Breaking Lockdown Protocol) पोलिसांनी राईचा पर्वत केला असा उलट आरोप त्यानं केला आहे.

अखेर या प्रकरणावर त्यानं स्वत: स्पष्टीकरण दिलं. (Breaking Lockdown Protocol) पोलिसांनी राईचा पर्वत केला असा उलट आरोप त्यानं केला आहे.

अखेर या प्रकरणावर त्यानं स्वत: स्पष्टीकरण दिलं. (Breaking Lockdown Protocol) पोलिसांनी राईचा पर्वत केला असा उलट आरोप त्यानं केला आहे.

मुंबई 10 जुलै: कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. (coronavirus) या वाढत्या रुग्णसंख्येची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने काही निर्बंध लागू केले आहेत. मात्र या निर्बंधांकडे दुर्लक्ष करत चित्रपटाच शूटिंग केल्यामुळे प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता जिमी शेरगिल (Jimmy Shergill) याला पोलिसांनी अटक केली होती. त्यामुळे त्याच्यावर प्रचंड टीका देखील करण्यात आली. अखेर या प्रकरणावर त्यानं स्वत: स्पष्टीकरण दिलं. (Breaking Lockdown Protocol) पोलिसांनी राईचा पर्वत केला असा उलट आरोप त्यानं केला आहे.

“म्हातारी तुझी आई असेल”; संतापलेल्या कविता कौशिकनं ट्रोलर्सची बोलती केली बंद

इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत जिमीनं आपल्या करिअरवर भाष्य केलं. त्यावेळी त्याने काही महिन्यांपूर्वी झालेल्या या अटकेमागचं कारणही सांगितलं. तो म्हणाला, “आम्ही सर्व नियमांचं पालन करूनच चित्रीकरण करत होतो. देशात काय चाललं आहे. याची पूर्ण जाणीव आम्हाला आहे. शिवाय आम्हाला आमच्या जिवाची काळजी देखील आहे. परंतु पोलिसांनी आणि त्यानंतर माध्यमांनी राईचा पहाड केला. फारच चुकीच्या पद्धतीने अफवा पसरवल्या गेल्या.”

‘हा स्प्रे मारला असता आमिरचा घटस्फोट झालाच नसता’; राखी सावंतचा अजब दावा

अभिनेता जिमी शेरगिल पंजांबमध्ये ‘युअर ऑनर 2’ या वेब सीरिजचं शूटिंग करत होता. एका शाळेमध्ये या वेब सीरिजचं शूटिंग सुरू होतं. यावेळी नाईट कर्फ्यू असतानाही रात्री आठ वाजल्यानंतर शूटिंग सुरु असल्याने पोलिसांनी सेटवर धडक दिली. यावेळी सेटवर शंभर लोक उपस्थित होते. त्यामुळे करोनाच्या नियमावलीचं पालन न केल्याने जिमी शेरगिलसह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पंजाबमध्ये देखील गेल्या काही दिवसात करोनाच्या रुग्णांची संख्या वाढतेय. त्यामुळेच प्रशासनाने कडक प्रतिबंध लागू केले आहेत. अशातही रात्री आठनंतर शूटिंग सुरू असल्याने पोलिसांनी ही कारवाई केली होती.

First published:

Tags: Bollywood actor, Crime, Lockdown