• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Jaya Prada करणार होत्या आत्महत्या; Amar Singh यांच्यामुळं वाचले प्राण

Jaya Prada करणार होत्या आत्महत्या; Amar Singh यांच्यामुळं वाचले प्राण

त्यांनी चक्क आत्महत्या देखील करण्याचा प्रयत्न केला होता. (Jaya Prada Thought Of Suicide) मात्र या कठिण प्रसंगात अमर सिंग यांनी त्यांची साथ दिली, अन् पुन्हा एकदा परिस्थिती विरोधात लढण्याची प्रेरणा दिली. पाहूया काय होता तो प्रसंग...

 • Share this:
  मुंबई 3 एप्रिल: जया प्रदा (Jaya Prada) या बॉलिवूडमधील एक नामांकित अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. आज त्यांचा वाढदिवस आहे. 59 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. जया प्रदा यांनी अभिनयासोबतच राजकारणात देखील यश मिळवलं. त्या संसदेतील दोन सभागृहाच्या सदस्य राहिल्या आहेत. मात्र इतकं यश मिळवणाऱ्या जया प्रदा एकेकाळी नैराश्येनं खचल्या होत्या. त्यांनी चक्क आत्महत्या देखील करण्याचा प्रयत्न केला होता. (Jaya Prada Thought Of Suicide) मात्र या कठिण प्रसंगात अमर सिंग यांनी त्यांची साथ दिली, अन् पुन्हा एकदा परिस्थिती विरोधात लढण्याची प्रेरणा दिली. पाहूया काय होता तो प्रसंग... अवश्य पाहा - ‘गमावली चव घेण्याची क्षमता’; दंगल गर्ल फातिमा अडकली कोरोनाच्या विळख्यात जया प्रदा यांनी 2019 मध्ये भाजपाच्या तिकीटावर उत्तर प्रदेशातील रामपूर येथून लोकसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता, परंतु त्यावेळी त्यांनी दिलेली एक मुलाखत मात्र चर्चेचा विषय ठरली होती. अवश्य पाहा - कंगना रणौतनं गाणं केलं कॉपी? चली चलीमुळं जयललितांचा व्हिडीओ होतोय सर्च 2009 साली त्यांनी समाजवादी पक्षाच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवली होती. या निवडणूकीत त्यांचा विजयही झाला होता. मात्र याच दरम्यान त्यांच्याच पक्षातील नेते आझम खान यांनी जया प्रदा यांचे काही फेक न्यूड फोटो आणि आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल केले होते. अर्थात हा आरोप मुलाखतीदरम्यान जया प्रदा यांनी केला होता. यामुळं त्यांच्यावर जोरदार टीका केली जात होती. पुढे ही टीका इतकी वाढली की आझम खान त्यांच्यावर असिड हल्ला करु शकतात अशीही भीती त्यांना वाटू लागली. या प्रकरामुळं त्या नैराश्येत गेल्या होत्या. आत्महत्या करण्याचे विचार त्यांच्या मनात येत होते. मात्र या कठिण काळात त्यांचे राजकीय गुरु अमर सिंग यांनी त्यांची मदत केली होती. ते त्यांच्या पाठिमागे खंबीरपणे उभे राहिले असा अनुभव जया प्रदा यांनी सांगितला होता. 2020 मध्ये अमर सिंग यांच्या निधनानंतर जया प्रदा यांनी आपण राजकीय गुरु गमावला असल्याची प्रतिक्रिया दिली होती.
  Published by:Mandar Gurav
  First published: