जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / ‘गमावली चव घेण्याची क्षमता’; दंगल गर्ल फातिमा अडकली कोरोनाच्या विळख्यात

‘गमावली चव घेण्याची क्षमता’; दंगल गर्ल फातिमा अडकली कोरोनाच्या विळख्यात

‘गमावली चव घेण्याची क्षमता’; दंगल गर्ल फातिमा अडकली कोरोनाच्या विळख्यात

दंगल गर्ल (Dangal Girl) फातिमा सना शेख (Fatima Sana Shaikh) हिला देखील कोरोनाची (Corona) लागण झाली आहे. फातिमानं स्वतःच इन्स्टाग्रामवरून (Instagram) आपल्या आजारपणाची बातमी दिली

  • -MIN READ
  • Last Updated :

    मुंबई 2 एप्रिल: बॉलीवूडमध्येही (Bollywood) सध्या कोरोनाच्या संसर्गानं हातपाय पसरले असून अनेक कलाकारांना कोविड-19नं (Covid-19) ग्रासलं आहे. बहुतांश कलाकार गृह विलगीकरणात राहून उपचार घेत आहेत. आमीर खान, रणबीर कपूर, संजय लीला भन्साळी, कार्तिक आर्यन, विक्रांत मेस्सी, रोहित सराफ, सिद्धांत चतुर्वेदी, मिलिंद सोमण आदींसह दंगल गर्ल (Dangal Girl) फातिमा सना शेख (Fatima Sana Shaikh) हिला देखील कोरोनाची (Corona) लागण झाली आहे. फातिमानं स्वतःच इन्स्टाग्रामवरून (Instagram) आपल्या आजारपणाची बातमी दिली आहे. कोविड 19च्या चाचणीचा आपला अहवाल पॉझिटीव्ह आला असून, सध्या गृहविलगीकरणात राहून उपचार घेत असल्याचं तिनं आपल्या चाहत्यांना कळवलं आहे. सर्वांनी काळजी घ्यावी असं आवाहनही तिनं केलं आहे. तिनं स्वतःचा एक फोटोही शेअर केला असून, कोविडमुळं आपल्या तोंडाची चव गेली असून कसलाही वास येत नाही. तसंच अंगही प्रचंड दुखत असल्याचं तिनं म्हटलं आहे. फातिमा वेळोवेळी आपल्या प्रकृतीबाबत सोशल मीडियावर अपडेट्स देत असते. अवश्य पाहा - कोरोनाग्रस्त कार्तिकनं घेतली एकता कपूरची मदत; ही मालिका पाहून होतोय बरा

    null

    दोन दिवसांपूर्वी तिनं इन्स्टाग्रामावर ज्येष्ठ अभिनेते अनिल कपूर (Anil Kapoor) यांनी पाठवलेल्या घरातील जेवणाचा फोटो शेअर केला होता. अनिल कपूर यांनी फातिमासाठी घरी बनवलेलं जेवण (Home Made Food) आणि मिठाई (Sweets) पाठवली होती. त्या जेवणाचे फोटो तिनं शेअर करत घरचं जेवण पाठवल्याबद्दल अनिल कपूर यांचे मनापासून आभार मानले होते. ‘अनिल कपूर यु आर द बेस्ट’ असं तिनं आपल्या आभाराच्या पोस्टमध्ये म्हटलं होतं. अवश्य पाहा - सोनम कपूरच्या गरुड अवताराची उडवली जातेय खिल्ली; अनोख्या फोटोशूटमुळं होतेय ट्रोल

    null

    दंगल या सिनेमात आमीर खानबरोबर (Aamir Khan) काम केलेल्या फातिमा सना शेखनं अल्पावधीतच आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलीवूडमध्ये नाव कमावलं आहे. अलीकडेच आलेल्या ल्युडो (Ludo) या चित्रपटातील तिच्या कामाचीही सर्वत्र प्रशंसा झाली होती. सध्या ती नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या ‘अजीब दास्तान’ (Ajeeb Daastaans) चित्रपटाच्या प्रसिद्धीत व्यस्त होती. करण जोहर निर्मित या चित्रपटाच्या प्रदर्शनाची फातिमा अतिशय उत्साहानं वाट पाहत आहे. याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला त्या वेळी ‘हर कहानी में कोई राज है छुपा, उद्या ट्रेलर प्रदर्शित होतोय’ असं तिनं लिहिलं होतं. फातिमा सना शेखचे चाहतेही आतुरतेनं तिच्या नवीन चित्रपटाची वाट पाहत असून, तिला लवकर बरं वाटावं यासाठी त्यांनी प्रार्थना केली असून, तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात