जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Jaya Bachchan: 'मी तिच्या पाठीमागे राजकारण...' सुन ऐश्वर्यासोबतच्या संबंधाविषयी स्पष्टच बोलल्या जया बच्चन

Jaya Bachchan: 'मी तिच्या पाठीमागे राजकारण...' सुन ऐश्वर्यासोबतच्या संबंधाविषयी स्पष्टच बोलल्या जया बच्चन

जया बच्चन - ऐश्वर्या राय बच्चन

जया बच्चन - ऐश्वर्या राय बच्चन

ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन एका मुलाखतीत सून ऐश्वर्या राय बच्चनसोबतच्या नात्याविषयी मोठा खुलासा केला आहे. त्यांनी केलेलं वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई,  02 मार्च :  सासू सुनेचं नातं कधी गोड कधी कडू असतं. त्यांच्यात छोट्या मोठ्या कुरबुरी चालू असणं हे काही कोणासाठी नवीन नाही. मग यात सेलिब्रेटी देखील मागे कसे असतील. ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन  यांची सून चक्क ऐश्वर्या राय आहे. या दोघी अनेकदा एकत्र दिसतात. या सेलिब्रेटी सासू सुनांचं नातं नेमकं कसं आहे याविषयी जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता असते. ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन एका मुलाखतीत सून ऐश्वर्या राय बच्चनसोबतच्या नात्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाल्या. त्यांनी केलेलं वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे. 2010 मध्ये रेडिफला दिलेल्या मुलाखतीत जया बच्चन यांनी सांगितले होते की, ऐश्वर्या राय त्यांची सून तर आहेच पण त्याशिवाय खूप खास मैत्रीण देखील आहे. दोघीही जवळच्या मैत्रिणींप्रमाणे एकमेकींशी सर्व काही शेअर करतात. जया बच्चन यांनी या मुलाखती दरम्यान ऐश्वर्याची एखादी गोष्ट त्यांना आवडली नाही तर त्या काय करतात याविषयी देखील खुलासा केला होता. Madhuri Dixit: ‘या’ प्रसिद्ध क्रिकेटरच्या प्रेमात पडली होती बॉलिवूडची धक धक गर्ल; का झाला लव्हस्टोरीचा शेवट? जया बच्चन म्हणाल्या होत्या कि, ‘ऐश्वर्याची एखादी गोष्ट मला आवडली नाही तर मी तिला ते सरळ स्पष्ट बोलून टाकते. मी तिच्या पाठीमागून कोणतही राजकारण करत नाही. जे काही आहे तर तिच्या तोंडावर बोलते.’

जाहिरात

जया बच्चन पुढे म्हणाल्या, ‘ऐश्वर्या माझ्यासाठी मैत्रिणीसारखी आहे. फक्त एवढाच फरक आहे की मी जरा जास्त नाटक करते आणि तिने माझा जास्त आदर करावा कारण मी वयाने तिच्यापेक्षा मोठी आहे. एवढंच त्यामागे कारण असतं. बाकी काहीच नाही. आम्हाला दोघींना घरात बसून वायफळ गप्पा मारायला आवडतं. अर्थात तिच्याकडे फार कमी वेळ असतो. पण ती जे काही करते ते आम्ही एन्जॉय करतो. माझं तिच्याबरोबर खूप चांगलं नातं आहे.’ त्यानंतर 2015 मध्ये ‘डिएनए’ ला दिलेल्या मुलाखतीत अभिषेक त्याची आई आणि पत्नीमधील नात्याविषयी व्यक्त झाला होता. तो म्हणाला होता कि, ‘‘आई आणि अॅश माझ्याविरोधात एकत्र येतात आणि त्या दोघी बंगाली भाषेत काहीतरी बडबडू लागतात. आई बंगाली असल्याने तिला ती भाषा येते आणि ऐश्वर्याने चोखेर बाली या चित्रपटात रितू दा (रितुपर्णो घोष) यांच्यासोबत काम केलं होतं, त्यामुळे तिलाही ती भाषा कळते, बोलता येते. त्यामुळे जेव्हा कधी त्या दोघींना माझ्याविरोधात बोलायचं असतं, तेव्हा त्या बंगाली भाषेत बोलू लागतात’’, असं अभिषेक म्हणाला होता.

News18लोकमत
News18लोकमत

अभिषेक हा ‘धूम 2’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ऐश्वर्याच्या प्रेमात पडला. 14 जानेवारी 2007 रोजी या दोघांचा साखरपुडा पार पडला आणि त्यानंतर 20 एप्रिल 2007 रोजी ऐश्वर्या-अभिषेकने लग्नगाठ बांधली. मुंबईतील प्रतीक्षा बंगल्यावर हा लग्नसोहळा पार पडला. 16 नोव्हेंबर 2011 रोजी ऐश्वर्याने मुलगी आराध्याला जन्म दिला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात