माधुरी तिच्या काळातील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे, तिच्या सौंदर्यावर आजही लाखो चाहते फिदा होतात.
माधुरीचे नाव तिच्या करिअरमध्ये अनेक अभिनेत्यांसोबत जोडले गेले होते, पण त्यात एका क्रिकेटरचा सुद्धा समावेश होता.
त्या काळातील प्रसिद्ध क्रिकेटर अजय जडेजाच्या प्रेमात माधुरी दीक्षित पडली होती. या दोघांच्या लव्हस्टोरीची खूप चर्चा झाली.
एका फोटोशूटदरम्यान त्यांची पहिली भेट झाली होती. या फिल्मफेअरच्या फोटोशूटमध्ये दोघांमध्ये रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळाली.
वृत्तांवर विश्वास ठेवला तर त्यांची प्रेमकहाणी इथूनच सुरू झाली. त्यावेळी माधुरीच्या करिअरची नुकतीच सुरुवात झाली होती तर अजय चांगला लोकप्रिय खेळाडू होता.
दोघांमध्ये सर्व काही ठीक चालले होते पण अजय जडेजाच्या कारकिर्दीत उतरती कळा लागल्याचे सांगितले जाते. याच कारणामुळे माधुरीच्या कुटुंबीयांनी या नात्याला नकार दिला होता.
एवढेच नाही तर अजय जडेजाही रॉयल फॅमिलीतला होता आणि त्याचे कुटुंब माधुरीसोबतचे नाते टाळत होते आणि दोघांना वेगळे व्हावे लागले होते असे म्हटले जाते.