मुंबई, 10 नोव्हेंबर : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत ही कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. काल रात्री कंगना मुंबईत सूरज बडजात्याच्या आगामी ‘उचाई’ चित्रपटाच्या स्क्रिनिंगला पोहोचली. स्क्रिनिंगला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती, पण कंगना आणि जया बच्चन यांच्या व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या व्हिडिओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. स्क्रिनिंगसाठी आलेल्या जया बच्चन आणि कंगना रानौत यांच्यात असं काही घडलं की चाहत्यांच्या नजरा फक्त एका व्हिडिओवर खिळल्या आहेत. बुधवारी रात्री मुंबईमध्ये ‘ ऊंचाई ’ चित्रपटाचं स्पेशल स्क्रिनिंग झालं. हे स्क्रिनिंग अनुपम खेर यांनी आयोजित केलं होतं. या स्क्रिनिंगच्या वेळचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये अनुपम खेर स्क्रिनिंगसाठी आलेल्या सर्व पाहुण्यांचं स्वागत करताना दिसले. अमिताभ बच्चन यांची पत्नी जया बच्चनही या स्पेशल स्क्रिनिंगसाठी उपस्थित होत्या. तर दुसरीकडे कंगना रणौतही या स्क्रिनिंगसाठी पोहोचली होती. योगायोगाने दोघी अचानक एकमेकींच्या समोर आल्या. दोघांना पाहून फोटोग्राफर्सनी ओरडायला सुरुवात केली. पण जया बच्चन यांनी कंगनाला पाहिल्यावर तिला चक्क दुर्लक्ष केलं. जया बच्चन कंगनाकडे दुर्लक्ष करत दुसरीकडे भाग्यश्रीला मिठी मारताना दिसत आहे. हा सगळा प्रकार कॅमेरात कैद झाला आहे. हेही वाचा - Malaika- Arjun: मलायका अरोराने अर्जुन कपूरला लग्नासाठी दिला होकार! फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमी ‘ऊंचाई’ च्या स्पेशल स्क्रिनिंगमध्ये जया बच्चन कंगना राणौतकडे साफ दुर्लक्ष करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर लगेच कमेंट्सचा पाऊस पाडला. त्याच वेळी, आणखी एक व्हिडिओ देखील समोर आला आहे ज्यामध्ये अमिताभ बच्चन-जया बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन कंगना रणौतला मिठी मारताना हसताना दिसत आहे.
कंगना राणौत आणि जया बच्चन यांच्या या प्रसंगावर चाहत्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी म्हटलंय कि, ‘‘कंगना राणौतला वाईट वाटलं असावं की जया बच्चन इथेही आल्या आहेत’’, तर काहींनी म्हटलं की, ‘‘जया बच्चन कंगनाला घाबरतात.’’ अशा अनेक कमेंट्स या व्हिडिओवर आहेत. पण त्याच वेळी ‘ऊंचाई’ च्या स्क्रीनिंग दरम्यानचा अजून एक व्हिडिओ देखील समोर आला आहे ज्यामध्ये अभिषेक बच्चन आणि कंगना रणौत एकमेकांशी मोकळेपणाने बोलताना दिसत आहेत. दोघेही एकमेकांना मिठी मारून हसत हसत गप्पा मारताना दिसत आहेत. ‘ऊंचाई’ हा चित्रपट उद्या म्हणजेच 11 नोव्हेंबरला थिएटरमध्ये दाखल होण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन, अनुपम खेर, बोमन इराणी, डॅनी डेन्झोंगपा, नीना गुप्ता, सारिका आणि परिणीती चोप्रा यांच्या भूमिका आहेत. महावीर जैन फिल्म्स आणि बाउंडलेस मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने राजश्री प्रॉडक्शनने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ही एक तीन मित्रांची कहाणी आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो ते बघणं महत्वाचं ठरणार आहे.