मुंबई, 06 जुलै : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र या वयातही चित्रपटसृष्टीत चांगलेच सक्रिय आहेत. ते लवकरच करण जोहरच्या आगामी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात दिसणार आहेत. त्यांना या चित्रपटात पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत. या चित्रपटात त्यांच्यासोबत जया बच्चन देखील मोठ्या पडद्यावर कमबॅक करणार आहेत. अनेक वर्षांनंतर प्रेक्षकांना या दोघांना एकत्र पाहण्याची संधी मिळणार आहे. अशातच आता नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत धर्मेंद्र यांनी करण जोहरच्या या चित्रपटात जया बच्चन आणि शबाना आझमी यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला. या अभिनेत्याने यापूर्वी जयासोबत ‘गुड्डी’ आणि ‘शोले’ सारख्या चित्रपटात काम केले आहे. अशातच जया बच्चन आणि धर्मेंद्र यांच्या नात्याची सध्या तुफान चर्चा होतेय. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत धर्मेंद्र यांनी एका जुन्या किस्स्यावर प्रतिक्रिया दिली आहे. जया बच्चन यांना एकेकाळी धर्मेंद्र आवडत असत. अभिनेत्रीला त्यांच्यावर क्रश होतं अशी चर्चा एकेकाळी रंगली होती. धर्मेंद्र आणि जया बच्चन यांनी गुड्डी या चित्रपटात एकत्र काम केले होते. चित्रपटाच्या सेटवर जया यांना धर्मेंद्र आवडू लागले होते. एवढे की, धर्मेंद्र सेटवर पोहोचताच जया त्यांना पाहून लाजेनं सोफ्याच्या मागे लपायच्या. आता एवढ्या वर्षानंतर धर्मेद्र यांनी या किस्स्यावर मौन सोडलं आहे.
‘जया बच्चन यांना तुम्ही आवडायचा हे खरे आहे का?‘असं जेव्हा धर्मेंद्र यांना विचारण्यात आलं तेव्हा अभिनेत्यानं सांगितलं की, “जयाला माझ्याबद्दल प्रेम आणि आदर होता. मी जया आणि अमिताभ यांना खूप वर्षांपासून ओळखतो. मला अजूनही आठवते की, शोलेचे शूटिंग करताना आम्हाला किती मजा यायची.” अशी प्रतिक्रिया धर्मेंद्र यांनी दिली आहे. Saroj Khan: ‘या’ सुपरस्टारचा डान्स पाहून खुर्चीवरून खाली पडल्या होत्या सरोज खान; काय होता तो किस्सा? स्वत: जया बच्चन यांनी धर्मेंद्र यांच्यावर क्रश असल्याची कबुली एके काळी दिली होती. 2007 मध्ये ही अभिनेत्री ‘कॉफी विथ करण’ या शो मध्ये आली होती. जिथे त्यांनी धर्मेंद्रवर क्रश असल्याची कबुली दिली होती. धर्मेंद्रसोबतच्या तिच्या पहिल्या भेटीची आठवण करून देताना जया शोमध्ये म्हणाल्या होत्या की, “तुम्हाला माहिती आहे, जेव्हा मी त्याला पहिल्यांदा पाहिलं आणि माझी त्याच्याशी ओळख झाली, तेव्हा असा एक सोफा होता… मी जाऊन त्याच्या मागे लपले. मी खूप घाबरले होते. मला काय करावं कळत नव्हतं. याचं कारण धर्मेंद्र खूपच देखणा माणूस. मला अजूनही आठवते की त्याने तेव्हा काय घातलं होतं. त्यांनी त्यावेळी पांढरी पॅन्ट आणि पांढरा शर्ट घातला होता. तो एखाद्या ग्रीक गॉडसारखाच दिसत होता!”
आता या दोघांना पुन्हा एवढ्या वर्षानंतर पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट 28 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.