मुंबई, 17 जानेवारी : बॉलिवूडचे प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांचा आज 75 वा वाढदिवस. त्यांचा जन्म 17 जानेवारी 1945ला ग्वालियारमध्ये झाला होता. जावेद अख्तर आज बॉलिवूडमधील नामवंत व्यक्ती असले तरीही त्यांच्यावर एक वेळ अशीही आली होती. जेव्हा त्यांना मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर 4 दिवस उपाशी राहावं लागलं होतं. पण आपली स्वप्न सोडली नाहीत. त्यांच्या हा प्रवास त्यांची पत्नी शबाना आझमी यांनी काही दिवसांपूर्वी ट्विटरवरुन सर्वांसमोर मांडला होता. बॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि स्क्रिनप्ले रायटर जावेद अख्तर यांनी काही दिवसांपूर्वीच सिने इंडस्ट्रीमध्ये 55 वर्ष पूर्ण केली. 1964मध्ये जावेद यांनी मुंबईमध्ये पहिलं पाऊल ठेवलं होतं. सध्याच्या घडीला ते बॉलिवूडमधील प्रसिद्ध लेखक आहेत. जावेद यांनी सलमान खानचे वडील सलीम खान यांच्यासोबत 70 आणि 80 च्या दशकात अनेक ब्लॉकबस्टर सिनेमांचे संवाद लिहिले. आणि काही सुपरहिट सिनेमांच्या कथाही लिहिल्या. ज्यात शोले, जंजीर सारख्या सिनेमांचा समावेश आहे. जावेद यांच्या पत्नी शबाना आझमी यांनी ट्विटरवर जावेद यांच्या स्ट्रगलिंग काळाविषयी लिहिलं.
करिनासारखं SLIM दिसायचंय? फॉलो करा हा Diet Plan
शबाना यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं, आजच्या दिवशी 55 वर्षांपूर्वी एक 19 वर्षीय मुलगा मुंबईमध्ये आला होता. खिशात फक्त 27 रुपये आणि डोळ्यात असंख्य स्वप्न घेऊन जावेद फुटपाथवर झोपले. 4-4 दिवस उपाशी राहिले पण त्यांना त्यांच्या कामावर विश्वास होता. ही समस्यांसमोर हार न मानणाऱ्या व्यक्तीची प्रेरणादायी कथा आहे. मी तुमचा खूप आदर करते.
On this date 55 years ago a 19 year old boy got down at Bombay Central Station with 27 rupees in his pocket and dreams in his eyes@javedakhtarjadu slept on pavements went without food 4 days but belief in himself.A story of not giving up to adversity and dignity. I salute him
— Azmi Shabana (@AzmiShabana) October 4, 2019
जावेद अख्तर आणि शबाना आझमी हे बॉलिवूडच्या प्रसिद्ध कपलपैकी एक आहेत. त्यांचा मुलगा फरहान आणि मुलगी झोया यांनी सुद्धा बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. शबाना यांच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं तर त्या लवकरच ‘शिर कुर्मा’ मध्ये दिसणार आहे. या सिनेमाची कथा समलैंगिक प्रेमावर आधारित आहे. या सिनेमात शबाना यांच्या व्यतिरिक्त स्वरा भास्कर आणि दिव्या दत्ता यांच्या मुख्य भूमिका आहेत. दबंग खानला वाटतेय या गोष्टीची भीती, स्वतःच केला खुलासा बॉलिवूडमध्ये पदार्पण करताना अवघे 27 रुपये घेऊन मुंबईत आलेल्या जावेद यांनी शोले सिनेमाच्या स्क्रिनप्लेसाठी तब्बल 1 कोटी रुपयांची मागणी केली होती. तेव्हा पासून आपल्याला हवं असलेलं मानधन मागण्याची प्रथा बॉलिवूडमध्ये सुरू झाली. त्यावेळी त्यांनी या सिनेमाचे नायक अमिताभ बच्चन यांच्यापेक्षाही जास्त मानधन घेतलं होतं. आज त्यांना बॉलिवूडमधील सर्वाधिक मेहनत करणारा लेखक म्हणून ओळखलं जातं. ‘तानाजी’त अजय देवगणच्या एंट्रीवर थिएटरमध्ये नोटांचा पाऊस, पाहा हा VIDEO