मुंबई, 17 जानेवारी : बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूरला रुपेरी पडद्यावर पाहिल्यावर ही नक्की खाते तरी काय? असा विचार आपल्या मनात आल्याशिवाय राहत नाही. कोणता इव्हेंट असो किंवा मग सिनेमा करिना नेहमीच फिट आणि ब्यूटीफुल दिसते. तिच्या स्टाइट आणि ड्रेसिंग सेन्समुळे करिना नेहमीच लाइमलाइटमध्ये असते. सामान्यतः आई झाल्यानंतर अभिनेत्रींचं करिअर संपतं मात्र करिना याला अपवाद ठरली आणि आज अनेक अभिनेत्री तिच्याकडून प्रेरणा घेताना दिसतात. तैमुरच्या जन्मानंतर करिनानं पुन्हा एकदा स्वतःवर लक्ष द्यायला सुरुवात केली. योगा आणि एक्सरसाइजच्या मदतीनं तिचं बाळंतपणानंतर अवघ्या काही दिवसांतच वजन कमी केलं. त्यानंतर आता ती पूर्वीप्रमाणेच फिट आणि ग्लोइंग दिसते. महिलांसाठी आहे प्रेरणा करिना कपूर अनेक अभिनेत्री तसेच महिलांसाठी फिटनेसच्या बाबतीत प्रेरणास्थान ठरत आहे. लवकरच ती गुड न्यूज या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सध्या ती या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बीझी आहे. यावेळी तीचा ग्लॅमरस लुक सर्वांनाच वेड लावतो. त्यामुळे सध्या तिचा डाएट प्लान जाणून घेण्याची इच्छा तिच्या सर्व चाहत्याना आहे. खास करुन अनेक महिला आणि तरुणींना करिनाचा डाएट प्लान जाणून घ्यायचा आहे ज्यामुळे तैमुरच्या जन्मानंतर करिना एवढी स्लिम दिसते आहे. असा आहे करिनाचा डाएट प्लान करिनाचा डाएट प्लान जाणून घेण्याची उत्सुकता पाहता तिच्या डाएटिशियन आणि सेलिब्रेटी न्यूट्रीशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी तिचा डाएट प्लाना त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला. हा डाएट प्लान करिनानं ‘गुड न्यूज’ सिनेमातील गाणं ‘चंदीगढ मे’च्या शूटिंगच्या अगोदर फॉलो केला होता. ऋजुता लिहितात, जेव्हा करिना या गाण्याचं शूट करणार होती. त्याचा एका आठवड्यापूर्वी तिनं हा डाएट प्लान फॉलो केला होता. जर तुम्हालाही करिनासारखं स्लिम दिसायचं असेल तर तुम्ही सुद्धा हा डाएट प्लान नक्की फॉलो करा…
दिवसाची सुरुवात… भिजवलेले काळे मनुके आणि केसर काळे मनुके खूप हेल्दी आणि अनेक पोषक तत्त्वांनी भरलेले असतात. मनुके विटॅमिन्स, मिनरल्स आणि एनर्जीचा मुख्य स्रोत आहेत. यात आयर्न, पोटॅशिअम, विटॅमिन आणि अॅन्टिऑक्सिडंट असतात. जे तुमच्या शरीराला सर्व प्रकारांच्या आजारांपासून दूर ठेवतात. नाश्ता चटणीसोबत पराठा मिड मील (नाश्ता आणि दुपारच्या जेवणामधलं खाणं) नारळ पाण्यात एक चिमुट सब्जाचं बी. याला तुळशीचं बी असंही म्हणतात. हे वजन कमी करण्यात मदत करतं. यात अल्फा-लिनोलेनिक अॅसिड असतं. तसेच सब्जामध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड मुबलक प्रमाणात असते. ज्यामुळे शरीरतील फॅट्स कमी होण्यास मदत होते. दुपारचं जेवण दही-भात, पापड
मिड मील (दुपारचं जेवण आणि संध्याकाळच्या नाश्त्याच्या मधलं खाणं) यात अक्रोड आणि चीजचा समावेश असतो. अक्रोडमध्ये गुड फॅट्स असतात. जे तुमचं वजन वाढवण्यापेक्षा कमी करण्यात मदत करतात. संध्याकाळचा नाश्ता बनाना मिल्क शेक – केळ्यातील कॅलरीज या त्यात असणाऱ्या फ्रक्टोजमुळे असतात. पण यासोबतच त्यात मोठ्या प्रमाणात फायबर सुद्धा असतात. जे तुमच्या रक्तातील साखरेचं प्रमाण वाढण्यापासून रोखण्याचं काम करतात. यात असलेले फायबर डायजेशन प्रक्रिया संथ करुन एनर्जी निर्माण करतात. ज्यामुळे तुम्ही दिर्घकाळ उत्साही राहता. रात्रीचं जेवण दही, खिचडी किंवा मग सूरण टिक्की वेज पुलावसोबत स्थूलत्व किंवा डायबिटिसनं त्रस्त असलेल्या लोकांनी त्याच्या डाएचटमध्ये सूरणाचा समावेश आवश्य करायला हवा. यात फायबर, मिनरल, विटॅमिन आणि फाइटोन्यूट्रीएंट असतात. त्यामुळे सूरण खाणं आरोग्याला फायदेशीर असतं. झोपण्यापूर्वी झोपण्यापूर्वी भूक लागल्यास दूध किंवा मिल्क शेक तुम्ही जर हे रुटीन योग्य प्रकारे फॉलो कराल आणि लोकल सीझनल आणि ट्रेडिशनल खाणं खात असाल तर तुमच्या बॉडीला शेपमध्ये ठेवणं खूपच सोपं असतं. याशिवाय करिना आठवड्यातून 5 तास व्यायाम सुद्धा करते.