दबंग खानला वाटतेय या गोष्टीची भीती, स्वतःच केला खुलासा

दबंग खानला वाटतेय या गोष्टीची भीती, स्वतःच केला खुलासा

सिनेमात स्टंट करतानाही न घाबरणाऱ्या सलमानला मागच्या काही दिवसांपासून एका गोष्टीची खूप भीती वाटत आहे.

  • Share this:

मुंबई, 16 जानेवारी : बॉलिवूडचा दबंग या वर्षी 'राधे' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे त्याचा हा सिनेमा वॉन्टेड सिनेमाचा सिक्वेल असल्याचं बोललं जात आहे. मात्र सलमाननं यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. काही दिवसांपूर्वीच सलमान दुसऱ्यांदा मामा झाला. सध्या तो त्याच्या फॅमिलीसोबत एन्जॉय करत आहे. पण लवकरच तो त्याच्या आगामी सिनेमाचं शुटिंग करणार आहे. या सिनेमात अ‍ॅक्शन सीन सुद्धा असणार आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सलमाननं आजकाल त्याला वाटत असलेल्या भीतीचा खुलासा केला.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सलमान म्हणाला, या वयात सिनेमांमध्ये अ‍ॅक्शन सीन देणं माझ्यासाठी खूप कठीण आहे. अनेकदा माझं वाढतं वय मला त्रास देतं. तसं पाहिलं तर मी पहिल्यापासून अ‍ॅक्शन सिनेमे केलेले असल्यानं माझ्या बॉडीला त्याची सवय झाली आहे मात्र काही ठराविक काळानंतर याचा त्रस होतोच. मला प्रत्येक सीन शूट करण्याआधी त्याची 5-6 वेळा रिहर्सल करावी लागते. त्याच अनेका पडतो-आपटतो. प्रत्येक सीन करण्यासाठी एवढी एनर्जी लागते की, तो सीन करता करता मी थकून जातो. पण जोपर्यंत आम्ही जखमी होत नाही तो पर्यंत आम्ही ते करत राहतो.

सलमान पुढे म्हणाला, ‘अनेकदा मला माझ्या वाढत्या वयाचीही भीती वाटते. कारण, आम्हाला नेहमीच प्रेक्षकांना काहीतरी वेगळं आणि चांगलं द्यायचं असतं. त्यामुळे तुम्हाला खूप हार्डवर्क करावं लागतं. तुम्ही याठिकणी बेशिस्तपणे वागू शकत नाही.’ याशिवाय कामाचं शेड्युल बीझी असल्यानं सलमान रोज फक्त 2-3 तास झोप घेतो. पण ज्यावेळी त्याला वेळ मिळतो त्यावेळी तो पेटिंग करतो किंवा मग टीव्ही पाहतो.

डिसेंबरमध्ये प्रभूदेवा दिग्दर्शित दबंग 3 हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. दबंग 3 नंतर आता पुन्हा एकदा प्रभूदेवा आणि सलमान खान ही जोडी राधे या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आली आहे. राधे या चित्रपटात सलमान खानसोबत दिशा पाटनी, रणदीप हुडा आणि जॅकी श्रॉफ बघायला मिळणार आहेत.

Published by: Megha Jethe
First published: January 16, 2020, 6:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading