'तानाजी'त अजय देवगणच्या एंट्रीवर थिएटरमध्ये नोटांचा पाऊस, पाहा हा VIDEO

'तानाजी'त अजय देवगणच्या एंट्रीवर थिएटरमध्ये नोटांचा पाऊस, पाहा हा VIDEO

अजय देवगणची प्रमुख भूमिका असलेला 'तानाजी' (tanaji the unsung warrior) हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे

  • Share this:

कोल्हापूर, 16 जानेवारी : आजपर्यंत एखाद्या सिनेमात आवडत्या अभिनेत्याच्या एंट्रीवर शिट्या आणि टाळ्यांचा कडकडाट आपण नेहमी अनुभवत असतो. पण, कोल्हापुरात अजय देवगणच्या एंट्रीवर प्रेक्षकांनी नोटा उधाळल्या. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

अजय देवगणची प्रमुख भूमिका असलेला 'तानाजी' (tanaji the unsung warrior) हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. राज्यभरात तानाजी सिनेमाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. तानाजी सिनेमा सुरू असतानाचा थिएटरमधला एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये अजय देवगणच्या एंट्रीवर त्याच्या चाहत्यांनी चक्क नोटा उधळल्या आहे. एका पाठोपाठ बंडलच्या बंडल सोडून नोटा उधळल्या असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे.  हा व्हिडिओ कोल्हापूरमधील पद्मा टॉकीजमधील असल्याचं सांगितलं जात आहे. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

तानाजी सिनेमा टॅक्स फ्री करावा

दरम्यान, तानाजी सिनेमाने 100 कोटींचा आकडा पार केला आहे. राज्यात तानाजी सिनेमा टॅक्स फ्री करावा, अशी मागणी लावून धरली जात आहे. 'स्वराज्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले, त्या तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित ‘तानाजी’ हा चित्रपट करमुक्त करावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, तानाजी मालुसरे हे एक वीर योद्धा. त्यांचे शौर्य नव्या पिढीसमोर यावे आणि त्यांच्या वीरतेच्या गाथा नव्या पिढीला कळाव्या, हा चित्रपट अधिकाधिक लोकांनी पहावा, यासाठी तो करमुक्त करावा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी इतिहासात कोंढाणा किल्ला सर करण्याचा तानाजी मालुसरे यांचा प्रसंग ऐतिहासिक आणि विलक्षण आहे. शिवछत्रपतींचे विश्वासू सहयोगी म्हणून तानाजी मालुसरे यांनी जिवाची बाजी लावून हा महत्त्वाचा गड सर केला आणि स्वराज्यासाठी बलिदान दिले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात अधिकाधिक शिवभक्त आणि मराठीजनांपर्यंत हा चित्रपट पोहोचणे आणि या ऐतिहासिक स्मृतींचे जतन होणे अतिशय आवश्यक आहे. म्हणूनच त्यांच्या शौर्याचे स्मरण होण्यासाठी हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करावा, अशी विनंती या पत्रातून केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 16, 2020 05:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading