मुंबई, 10 जून : कुणाच्याही घरात कोरोनाव्हायरसने (coronavirus) प्रवेश केला तर त्या घरात काय परिस्थिती असेल, तशीच परिस्थिती सध्या बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूरच्या (janhavi kapoor) घरातही आहे. जान्हवीच्या घरातील 3 जणांना कोरोनाव्हायरसची लागण झाली आणि त्यानंतर जान्हवी कपूरने धसका घेतला. यानंतर ती जास्त खबरदारी घेऊ लागली.
जान्हवीच्या घरात काम करणारे तीन जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समजल्यानंतर जान्हवीने खूप काळजी घ्यायला सुरुवात केली. आपले वडील, बहीण आणि घरातील प्रत्येक गोष्टींवर ती कटाक्षाने लक्ष देऊ लागली. फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत जान्हवीने आपण सध्या कशी खबरदारी घेत आहोत हे सांगितलं आहे.
जान्हवी म्हणाली, "लॉकडाऊनमध्ये आम्हाला एकमेकांना वेळ देता येत होता त्यामुळे लॉकडाऊनचा आनंद आम्ही घेत होते. मात्र जेव्हा आमच्या घरात कोरोनाव्हायरसची तीन प्रकरणं सापडली तेव्हा आम्हाला धक्काच बसला. 5 ते 6 दिवस आम्ही सर्वजण खूप घाबरलो होतो. आमच्यापैकी कुणीच घराबाहेर गेलं नाही. त्यामुळे आमच्या घरात कोरोना नेमका आला कसा हे आम्हाला समजलंच नाही"
हे वाचा - बिकिनी फोटोवरून गँगरेपची धमकी, कोण आहे ही अलाना पांडे, पाहा PHOTOS
"तेव्हापासून मी आता घरात विशेष खबरदारी घेते आहे. वडील आणि बहीण खुशीवर विशेष लक्ष ठेवते. आताही त्यांना रात्री गरम पाणी हवं असेल तर मी गरम पाणी आणण्यासाठीदेखील ग्लोव्हज आणि मास्क घालूनच किचनमध्ये जाते. याची तशी गरज नाही मात्र तरी मी खबरदारी म्हणून असं करते. प्रत्येकाने गरम पाण्याची वाफ घ्यावी आणि गरम पाणी प्यावं, असं आवाहन मी करते", असं जान्हवी म्हणाली.
हे वाचा - Parle-G कंपनीला अभिनेता रणदीप हुड्डाचा खास अपील, वाचा तो नेमकं काय म्हणाला
"आता माझ्या खांद्यावर जबाबदारी आली आहे, हे मला आवडतं आहे. माझे वडील आणि बहीणवर मी सातत्याने लक्ष ठेवते. प्रत्येक गोष्टी मी स्वत: हाताळाव्यात असं मला वाटतं आणि ते करताना मला खूप चांगलं वाटतं आहे. हे सर्व थोडं तणावपूर्ण असलं तरी यामुळे मी सर्वांशी जोडलेली राहते", असं जान्हवीने सांगितलं.
संकलन, संपादन - प्रिया लाड
हे वाचा - मीकानं बर्थडे पार्टीत राखीला जबरदस्ती केलं KISS, अनेक वर्षांनी दिलं स्पष्टीकरण