बिकिनी फोटोवरून गँगरेपची धमकी, कोण आहे ही अलाना पांडे, पाहा PHOTOS
अलाना पांडेनं तिच्या इन्स्टाग्रामवर काही दिवसांपूर्वी काही बिकिनी फोटो शेअर केले होते. पण धक्कादायक गोष्ट म्हणजे, या फोटोवरुन तिला एका महिला युजरनं गँगरेपची धमकी दिली आहे.
|
1/ 10
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेची चुलत बहीण अलाना पांडे सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.
2/ 10
नेहमीच आपल्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत राहणारी अलाना सध्या मात्र एका वेगळ्याच कारणानं सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.
3/ 10
काही दिवसांपूर्वी तिनं शेअर केलेल्या बिकीनी फोटोवरून सध्या सोशल मीडियावर खूप गोंधळ सुरू झाला आहे. तिच्या या फोटोवर अनेकांनी अश्लील कमेंट केल्या आहेत.
4/ 10
अलाना पांडेनं तिच्या इन्स्टाग्रामवर काही दिवसांपूर्वी काही बिकिनी फोटो शेअर केले होते. पण धक्कादायक गोष्ट म्हणजे, या फोटोवरुन तिला एका महिला युजरनं गँगरेपची धमकी दिली आहे.
5/ 10
हे प्रकरण तेव्हा समोर आलं जेव्हा अलानानं याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. अलानानं तिच्या पोस्टमध्ये लिहिलं, माझ्या पोस्टवर एका महिलेनं कमेंटमध्ये लिहिलं होतं की, 'माझ्यावर गँगरेप व्हायला हवा. कारण मी बिकीनी फोटो शेअर केला होता. '
6/ 10
अलानानं सांगितलं की, मला गँगरेपची धमकी देणारी ही महिला विवाहित होती आणि तिला एक मुलगी सुद्धा आहे. जी माझ्यापेक्षा लहान आहे.
7/ 10
अशा कमेंट माझ्या फोटोंवर रोज येत असतात आणि रोज सकाळी उठल्यावर अशा गोष्टी वाचणं आता आयुष्याचा एक भाग झाला आहे मात्र असं करणारे लोक फक्त 1% आहेत. असं अलाना सांगते.
8/ 10
अलाना ही एक बिकिनी मॉडेल आणि अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर तिचा स्वतःचा वेगळा चाहता वर्ग आहे.
9/ 10
मात्र अलानाची चर्चा सध्या भारतात तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे होत आहे. त्यामुळे ती कोण आहे याबाबत सर्वांना उत्सुकता आहे.
10/ 10
अलाना ही अभिनेता चंकी पांडे यांचा भाऊ चिक्की पांडे यांची मुलगी आहे. म्हणजे ती अनन्याची चुलत बहीण आहे.