मुंबई, 21 फेब्रुवारी : अभिनेत्री श्रीदेवी बॉलिवूड मधील अष्टपैलू कलाकारांपैकी एक होत्या. त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले. त्यांच्या मृत्यूनंतरही चाहत्यांमध्ये त्यांच्या अभिनयाची जादू अद्याप टिकून आहे. 21 फेब्रुवारी 2018 ला वयाच्या 54 व्या वर्षी श्रीदेवी यांचा गूढ मृत्यू झाला. दुबईत एका लग्नात सहभागी होण्यासाठी गेलेल्या श्रीदेवी बाथटबमध्ये बुडलेल्या अवस्थेत आढळल्या होत्या. त्यांच्या मृत्यूला आज पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या निमित्त त्यांची थोरली मुलगी जान्हवी कपूर आणि पती बोनी कपूर यांनी इन्स्टाग्रामवर काही हृदयस्पर्शी फोटो शेअर केले आहेत. जान्हवीनं इन्स्टाग्रामवर आई सोबतचा फोटो शेअर केला आहे आणि त्यासोबत एक भावनिक पोस्टही लिहिली आहे. तिनं लिहिलं आहे, “मी अजूनही तुला सर्वत्र शोधत आहे मम्मा, तरीही मी जे काही करते आहे त्याचा तुला अभिमान वाटेल, अशी मला आशा आहे. मी जिथे जाते आणि जे काही करते त्याची सुरुवात आणि शेवट तुझ्यापासूनच होतो.” हेही वाचा - Dhanush New Home:साऊथ स्टार धनुषने आईबाबांसाठी खरेदी केलं आलिशान घर; 150 कोटींचा महाल आतून दिसतो असा जान्हवीच्या पोस्टवर बॉलिवडूमधील अनेक सेलिब्रिटीं नी प्रतिक्रिया दिली आहे. दिग्गज डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी कमेंट सेक्शनमध्ये गुलाबी हार्ट इमोजी टाकले आहेत. भूमी पेडणेकर, रकुल प्रीत सिंग आणि वरुण शर्मा यांनीही मनीष मल्होत्राचं अनुकरण केलं आहे. जान्हवीचे काका आणि अभिनेता संजय कपूर व त्याची पत्नी महीप कपूर यांनीही या पोस्टखाली रेड हार्ट्स टाकले आहेत.
जान्हवी कपूरचे वडील बोनी कपूर यांनीही त्यांची दिवंगत पत्नी श्रीदेवी यांच्या स्मरणार्थ एक पोस्ट लिहिली आहे. श्रीदेवी यांच्या एका सुंदर फोटोसह बोनी कपूर यांनी लिहिलं आहे की, ‘पाच वर्षांपूर्वी तू आम्हाला सोडून गेलीस… तुझं प्रेम आणि आठवणी आम्हाला बळ देत राहतील आणि कायम आमच्यासोबत राहतील.’ या पोस्टखाली संजय कपूर यांनी रेड हार्ट इमोजी शेअर केला आहे. हेही वाचा - Sridevi Biography: मृत्यूच्या 5 वर्षांनी श्रीदेवी नव्या रुपात भेटीला येणार! पतीनं केली मोठी घोषणा हाच फोटो इन्स्टाग्राम स्टोरीजवर शेअर करताना बोनी कपूर यांनी ‘जो ना मिल सका’ या गझलमधील ओळी सोबत टाकल्या आहेत. “जो चला गया मुझे छोड़कर, वो आज तक मेरे साथ है,” असं त्यांनी लिहिलं आहे. श्रीदेवी यांनी चांदनी, मिस्टर इंडिया, जुदाई, खुदा गवाह, नगीना आणि सदमा यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलेलं होतं. काही वर्षे ब्रेक घेतल्यानंतर, 2012 मध्ये ‘इंग्लिश विंग्लिश’ चित्रपटाद्वारे त्यांनी जोरदार पुनरागमन केलं होतं. मॉम हा त्यांचा शेवटचा आणि 300वा चित्रपट ठरला. ज्यासाठी त्यांना मरणोत्तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. काही दिवसांपूर्वी, बोनी कपूर यांनी घोषणा केली की, श्रीदेवी यांचं चरित्र - श्रीदेवी: द लाइफ ऑफ ए लिजेंड - या वर्षी रिलीज होणार आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनाचे हक्क वेस्टलँड बुक्सनं विकत घेतले आहेत.
आपल्या दिवंगत पत्नीबद्दल बोलताना बोनी कपूर म्हणाले, “श्रीदेवी ही निसर्गाची एक शक्ती होती. जेव्हा ती स्क्रीनवर तिची कला तिच्या चाहत्यांसमोर दाखवायची तेव्हा ती सर्वात आनंदी असायची. पण, वैयक्तिक आयुष्याचा खासगीपणा जपण्यासाठीदेखील ती आग्रही असायची. धीरज कुमारांना ती कुटुंबातील सदस्य मानत असे. ते संशोधक, लेखक आणि स्तंभलेखक आहेत. आम्हाला आनंद आहे की ते तिच्या असाधारण आयुष्यावर पुस्तक लिहीत आहेत.”