'फेमिनिझम म्हणजे ब्रा जाळून मिशा वाढवणं नाही...' सोनमनं सांगितली 15 वर्षांपूर्वीची आठवण

'फेमिनिझम म्हणजे ब्रा जाळून मिशा वाढवणं नाही...' सोनमनं सांगितली 15 वर्षांपूर्वीची आठवण

'मला आठवतंय 12 वर्षांपूर्वी मला कुणीतरी विचारलं होतं, तुम्ही फेमिनिस्ट आहात का? मी - 'हो' असं उत्तर दिलं आणि....'

  • Share this:

शिखा धारिवाल

मुंबई, 9 सप्टेंबर : सामाजिक विषयात आपली मतं बेधडकपणे मांडण्यात सोनम कपूरचा हात कुणी धरू शकत नाही. ती सोशल मीडियावर व्यक्त होतच असते, या वेळी एका वृत्तपत्राा दिलेल्या मुलाखतीत तिनं एक सनसनाटी विधान केलं. News18 च्या प्रतिनिधीनं सोनमला याविषयी विचारलं असता, सोनमनं स्त्रीवादाविषयी तिची मतं परखडपणे प्रदर्शित केली. "मी फिल्म इंडस्ट्रीत प्रवेश केला, तेव्हा इथल्या हिरोइन्सना फेमिनिझमचा नेमका अर्थच माहीत नव्हता. स्त्रीवादाचा अर्थ काय हे त्यांना कळायचही नाही."

नुसती ब्रा जाळायची आणि मिशा वाढवायच्या म्हणजे फेमिनिझम असं मुळीच नाही. आज ज्या अभिनेत्री स्त्रीवादाबद्दल भरभरून बोलत आहेत, 10-12 वर्षांपूर्वी असं उघडपणे बोलण्याची कोणातही हिंमत नव्हती.

"मला आठवतंय 12 वर्षांपूर्वी मला कुणीतरी विचारलं होतं, तुम्ही फेमिनिस्ट आहात का? मी - हो असं उत्तर दिलं. मी फेमिनिस्ट आहे. त्यावर माझ्या पब्लिसिटी टीमने मला समजावण्याचा प्रयत्न केला होता की, असं तुम्ही बोलायला नको होतं. कारण तुम्ही अशा स्त्रीवादाच्या गप्पा करायला लागलात तर लोक तुम्हाला अन-फेमिनाइन समजतील."

हे वाचा - आता रानू मंडलसोबत तिच्या मुलीनेही गायलं गाणं, VIDEO VIRAL

म्हणूनच स्त्रीवादाचा खरा अर्थ समजून घ्यायला पाहिजे, असं सोनम सांगते. ही साधी संकल्पना आहे. प्रत्येक बाबतीत स्त्री-पुरुषांना समान संधी, समान न्याय म्हणजे स्त्रीवाद. आजही आपल्या समाजात पुरुषांच्या तुलनेत स्त्रीला समान अधिकार दिले जात नाहीत. भेदभाव होतो. लवकरच या परिस्थितीत बदल होईल अशी आशा आहे. अनेक लोक- यामध्ये स्त्रियाच नाही तर पुरुषांचा सहभाग मोठा आहे, हा भेदभाव मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत, असं सोनम सांगते.

हे वाचा -धर्माच्या नावाखाली सिनेमे सोडणाऱ्या झायरा वसीमच्या Beach Look वर संतापले नेटीझन

सोनम कपूरचा द झोया फॅक्टर हा सिनेमा लवकरच प्रदिर्शित होतोय. भारतीय क्रिकेट टीमसाठी लकी चार्म ठरलेल्या एका तरुणीच्या भोवती या सिनेमाचं कथानक फिरतं. अनुजा चौहान यांच्या याच नावाच्या कादंबरीवर हा सिनेमा बेतलेला आहे. 20 सप्टेंबरला झोया फॅक्टर रीलिज होईल. सोनमच्या वडिलांची भूमिका संजय कपूरने केली आहे. खऱ्या आयुष्यात संजय सोनमचा सख्खा काका आहे.

VIDEO: भरधाव कारमधून रस्त्यावर पडली दीड वर्षाची चिमुकली, पुढे काय झालं तुम्हीच पाहा...

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: September 9, 2019, 6:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading