Jacqueline Fernandez च्या स्टायलिस्टचा मोठा खुलासामुंबई, 24 सप्टेंबर : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात खूप दिवसांपासून चर्चेत आहे. महाठग सुकेश चंद्रशेखरनं 200 कोटींचा केलेला गैरव्यवहार प्रकरणी जॅकलीनचं नाव समोर आलं तेव्हापासून तिच्या अडचणी वाढत चालल्याचं दिसत आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचा तपास सुरू असून अनेक गोष्टी समोर येत आहे. अशातच EOW ने केलेल्या चौकशीत जॅकलीनच्या स्टायलिस्टने मोठा खुलासा केला आहे. जॅकलीन फर्नांडिसचा स्टायलिस्ट प्रसिद्ध फॅशन डिझायनर लिपाक्षी इलावाडीलाही चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. timesnownews.com ने दिलेल्या वृत्तानुसार, लीपाक्षी इलावाडीने चौकशीदरम्यान खुलासा केला की, ‘सुकेशने जॅकलीनसाठी कपडे आणि भेटवस्तू खरेदी करण्यासाठी 3 कोटी रुपये दिले होते. सुकेश चंद्रशेकरला अटक झाल्यानंतर लगेचच तिनं त्याच्याशी सर्व संबंध तोडले’. हेही वाचा - VIDEO: सुष्मिता सेनच्या वहिनीने सांगितला ‘त्या’ रात्रीचा किस्सा; हे ठरलं घटस्फोटाचा निर्णय बदलण्याचं कारण मनी लाँड्रिंग प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसच्या विरोधात दिल्ली पोलीस सातत्याने तपास करत आहेत. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जॅकलीन अनेकवेळा ईडीसमोर चौकशीसाठी हजर झाली आहे. ज्यामध्ये तिने सुकेश चंद्रशेखर यांच्याकडून अनेक महागड्या भेटवस्तू घेतल्याचे मान्य केले होते.
दरम्यान, 200 कोटींच्या खंडणीचा आरोप असलेला सुकेश चंद्रशेखर सध्या दिल्लीच्या तुरुंगात आहे आणि त्याच्यावर 10 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी सुकेश आणखी काही बॉलिवूड अभिनेत्रींच्या संपर्कात होता, असंही समोर आलंय. यामध्ये अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेहीचं नाव प्रामुख्याने पुढं आलंय.