मुंबई, 24 सप्टेंबर- बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन नेहमीच आपल्या खाजगी आणि व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत असते. अभिनेत्रीप्रमाणेच तिचा भाऊ राजीव सेन आणि वहिनी चारु असोपादेखील आपल्या खाजगी आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत आहेत. टीव्ही अभिनेत्री चारु असोपाने 2019 मध्ये बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिताचा भाऊ राजीव सेनसोबत लग्न केलं होतं. लग्नापूर्वी दोघेही अनेक वर्षे एकमेकांना डेट करत होते. लग्नानंतर वर्षभरातच त्यांचं नातं बिघडू लागलं होतं. या दोघांमधील बाचाबाचीही माध्यमांसमोर आली होती. दोघेही सोशल मीडियावर पोस्टच्या माध्यमातून एकमेकांना टार्गेट करायचे. इतकंच नव्हे तर लॉकडाऊनच्या काळात दोघेही विभक्त राहात होते. राजीवने अनेकदा आपल्या लेकीला मिस करत असल्याच्या पोस्ट शेअर केल्या होत्या. त्यानंतर त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. यासाठी दोघांनीही कायदेशीर मार्गाचा अवलंबदेखील केला होता. पण आता राजीव सेन आणि चारु असोपा यांनी त्यांच्या लग्नाला दुसरी संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतंच या जोडप्याने जाहीर केलं आहे की ते दोघेही पुन्हा एकत्र आले आहेत. दोघे एकत्र राहतात. चारु आसोपाने नुकतंच तिचा घटस्फोटाचा निर्णय बदलून लग्नाला आणखी एक संधी देण्यामागचं कारण उघड केलं आहे. चारु असोपा नावाच्या तिच्या नव्या व्लॉगमध्ये,चारु असोपाने उघड केलं आहे की, तिला आणि राजीव यांना विभक्त होण्याचा निर्णय बदलण्यासाठी कशामुळे प्रेरणा मिळाली. आपल्या कठीण काळात आपली साथ दिल्याबद्दल तिने तिच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. चारुने पुढे खुलासा केला की, जेव्हा ती भीलवाडामध्ये होती तेव्हा तिने ठरवलं होतं की, ती मुंबईला परत येणार आणि आपली लेक जियानासोबत एक नवं आयुष्य सुरु करणार.
चारु असोपाने सांगितलं की, आपला देव आणि दैवी शक्तीवर खूप विश्वास आहे. या शक्तीच्या वर काहीही नाही. आपल्या निर्णयामध्ये दैवी हस्तक्षेप असल्याचं सांगून चारूने न्यायालयाच्या कामकाजाच्या आदल्या रात्री काय घडलं ते सांगितलं आहे. चारुने खुलासा केला की, ती 29 ऑगस्ट 2022 रोजी मुंबईत पोहोचली होती आणि ती आणि राजीव 30 ऑगस्ट 2022 रोजी कौटुंबिक न्यायालयात जाणार होते. त्यादरम्यान काय घडलं हे चारुने स्पष्ट केलं आहे.
**(हे वाचा:** Priyanka Chopra: विदेशात प्रियांका चोप्राचा देसी तडका; न्यूयॉर्कमध्ये घेतला पाणीपुरीचा आस्वाद ) या व्हिडीओमध्ये चारुने पुढे सांगितलं की, कोर्टात जाण्याच्या आदल्या रात्री ती आणि राजीव बसले होते. तेव्हा त्यांच्यामध्ये संवाद झाला. दरम्यान त्यांच्यामध्ये निर्माण झालेले अनेक गैरसमज आणि तक्रारी दूर झाल्या. अभिनेत्रीने पुढे सांगितलं की, कदाचित बाप्पाने त्यांची मुलगी जियानाच्या फायद्यासाठी त्यांच्या नात्याला संधी द्यावी अशी इच्छा होती. यानंतर दोघांनी मुलगी जियानासोबतचा फॅमिली फोटो शेअर करत एकत्र राहण्याची घोषणा केली होती.सध्या हे दोघे पुन्हा एकदा आनंदाने आपल्या वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत आहेत.