नवी दिल्ली, 26 मार्च : देशात कोरोना व्हायरसचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे आता लोकांना बाहेर पडायचं असेल तरी सोशल डिस्टन्सिंग ठेवावं लागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी लॉकडाउनची घोषणा केली. तेव्हा मोदी म्हणाले की, पुढच्या 21 दिवसांपर्यंत तुम्ही घरातून बाहेर पडणं विसरा आणि सोशल डिस्टन्सिंग पाळा. आरोग्य तज्ज्ञांनीसुद्धा याबाबत इशारा दिला आहे. आताच योग्य पावलं उचलली नाही तर कोरोनाचा विळखा अधिक तीव्र होईल. दरम्यान, बॉलिवूड अभिनेते परेश रावल यांचं एक ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांनी सोशल डिस्टन्सिंगबाबत एक ट्विट केलं आहे. परेश रावल म्हणाले होते की, शेवटी सोशल डिस्टन्सिंगचं हिंदी नाव मिळालं. हिंदीत याला ‘तन दूरी’ म्हणतात. परेश रावल यांच्या ट्विटरनंतर युजर्सनी वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत. परेश रावल हे सोशल मीडियावर सक्रीय असतात.
Finally got the Hindi name of social distancing.
— Paresh Rawal (@SirPareshRawal) March 26, 2020
TAN DOORI
भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्य 649 इतकी झाली आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे 13 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना संकट ओढावलं असताना देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्या म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाउनचा निर्णय घेतला. यामुळे कोणी उपाशी राहू नये. सरकार गरीब लोकांपर्यंत पैसे पोहोच करेल. एक लाख 70 हजार कोटींचे पॅकेज यासाठी जाहीर केलं आहे. कोरोनाचा हातावर पोट असलेल्या लोकांवर परिणाम होणार आहे. तर आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी 50 लाख रुपयांचे विमा संरक्षण दिलं जाणार आहे. हे वाचा : ‘Lockdown मध्ये माझ्या डोक्यावर केस येतील’ अनुपम खेर यांची पोस्ट व्हायरल