‘Lockdown मध्ये माझ्या डोक्यावर केस येतील’ अनुपम खेर यांची पोस्ट व्हायरल

‘Lockdown मध्ये माझ्या डोक्यावर केस येतील’ अनुपम खेर यांची पोस्ट व्हायरल

अभिनेता अनुपम खेर यांची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात त्यांनी लॉकडाउनचा संबंध त्यांच्या डोक्यावरील केसांशी जोडला आहे.

  • Share this:

मुंबई, 26 मार्च :  बॉलिवूडचे सर्वच कलाकार सध्या लॉकडाउनमुळे घरी आहेत. अशा परिस्थिती ते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांशी संवाद साधताना दिसत आहेत. तसेच कोरोना व्हायरसबद्दल लोकांना जागरुक करताना दिसत आहेत. पण अभिनेता अनुपम खेर यांची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात त्यांनी लॉकडाउनचा संबंध त्यांच्या डोक्यावरील केसांशी जोडला आहे.

अनुपम खेर यांनी नुकतेच इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे. त्यांनी लिहिलं, 'मला हे जाणवत आहे की, होम क्वारंटाईन आणि लॉकडाऊनच्या दरम्यान माझ्या डोक्यावरील केस परत येतील. जर असं झालं तर माझ्यावर कोणती हेअरस्टाइल सर्वात चांगली दिसेल. तुम्हाला काय वाटतं? हसू नका. हा खूप गंभीर विषय आहे. तसं पाहायला गेलं तर स्टाइलमध्ये सर्वच चांगले आहेत पण तरीही तुम्ही सुचवा.'

Lockdown 21 Days : रिंकू सध्या काय करते माहित आहे का? पाहा VIDEO

अनुपम यांनी या पोस्टसोबत बरेच फोटो शेअर केले आहेत. त्यांच्या या पोस्टवर खूप कमेंट येत आहेत. याआधी अनुपम यांनी एक व्हिडीओ शेअर केला होता ज्यात त्यांनी , "ऐ मेरे बिछड़े बालों, फिर से उग आओ....तुम पे मैं कुरबान, जुल्म के पंजों में हूं, मैं भी अब गंजों में हूं, सिर हुआ वीरान. आंख और माथे पे कैसे, झट से गिर जाते थे तुम, जब बिखरते थे, अदाएं कितनी बिखराते थे तुम. सूना ये सिर कर गए, तुम तो कब के छड़ गए. रह गए दो कान...." अशी कविता केली होती.

लॉकडाउनमध्ये गुढीपाडवा सेलिब्रेशनवर सोनाली बेंद्रे म्हणते, ‘हा उपहास आहे की...’

अनुपम खेर नेहमीच त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असतात. त्यांच्या पोस्ट आणि व्हिडीओ अनेकदा व्हायरल होताना दिसतात. त्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर त्यांनी शेवटचं वन डे या सिनेमात काम केलं होतं. या सिनेमात अभिनेत्री इशा गुप्ता त्यांच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसली होती. याशिवाय मागच्या वर्षी त्यांनी भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या बायोपिकमध्ये काम केलं होतं.

बायकोला पाठीवर बसवून मिलिंद सोमणनं मारले पुशअप्स; म्हणाला, 'तुम्ही असं काही…'

First published: March 26, 2020, 4:29 PM IST

ताज्या बातम्या