मुंबई, 17 सप्टेंबर : गेल्या काही काळापासून जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अडचणींत सापडली असून दिवसेंदिवस तिच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. सुकेश चंद्रशेखरनं 200 कोटींचा केलेला गैरव्यवहार प्रकरणी जॅकलीनचं नाव बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. बुधवारी, दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) 200 कोटींच्या खंडणीप्रकरणी जॅकलिन फर्नांडिसची 8 तास चौकशी केली. यादरम्यान बरीच महत्त्वाची माहिती समोर आली. एएनआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, जॅकलिन फर्नांडिस सुकेश चंद्रशेखर यांच्यावर इतकी प्रभावित झाली होती की, ती त्याला आपल्या स्वप्नातील राजकुमार मानू लागली आणि त्याच्याशी लग्न करू इच्छित होती. 200 कोटींच्या खंडणी प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखरचा गुन्हेगारी संदर्भात माहिती असतानाही जॅकलिन फर्नांडिसने त्याच्याशी संबंध तोडले नाहीत. त्यामुळे जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणी वाढू शकतात. हेही वाचा -
Narendra Modi Birthday :‘राम, कृष्णा आणि गांधींसारखे तुम्ही अमर आहात’; कंगनाच्या मोदींना खास शुभेच्छा
सुकेशने जॅकलिनना इम्प्रेस केले होते. तो प्रचंड श्रीमंत आहे आणि त्याची कोट्यावधींची संपत्ती आहे असे तो जॅकलिनला भासवत होता. पण ही सगळी संपत्ती त्याने खंडणीद्वारे मिळवली होती. सुकेशने फक्त जॅकलीनच नाही तर आणखी काही अभिनेत्रींनाही भेटवस्तू दिल्या होत्या. पोलिसांच्या मते, या प्रकरणात आणखी 5 बॉलिवूड अभिनेत्रींची नावे समोर येऊ शकतात. अशा परिस्थितीत,आता ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री निक्की तांबोळीचं नाव समोर आलं आहे.
दरम्यान, सुकेशने मुंबईतील जुहू येथे जॅकलिन फर्नांडिससाठी एक आलिशान बंगला खरेदी करण्याची योजना आखली होती. त्यासाठी त्याने अॅडव्हान्स रक्कमही भरली होती. याशिवाय त्याने जॅकलिनच्या आई-वडिलांना बहरीनमध्ये एक आलिशान बंगला गिफ्ट केला होता. जॅकलिनची चौकशी केली असता तिने श्रीलंकेच्या घरी गेल्याची कबुली दिली, असा दावाही ईडीच्या आरोपपत्रात करण्यात आला आहे. महाठग सुकेश चंद्रशेखरने 200 कोटींचा गंडा लावल्याचा आरोप आहे. त्याने फोर्टेस हेल्थ केअरचे माजी प्रवर्तक शिविंदर सिंह यांच्या पत्नीकडून 200 कोटी उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखर काही बॉलिवूड अभिनेत्रींच्या संपर्कात असल्याचा खुलासा झाला होता. यामध्ये अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेहीचं नाव प्रामुख्याने पुढं आलं होतं.