मुंबई, 17 सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 72 वा वाढदिवस साजरा करत आहेत. पंतप्रधान मोदींना देशभरातून वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. बॉलीवूड सेलिब्रिटीही पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतने पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. तिने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. कंगनाने पीएम मोदींसोबतचा एक जुना फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये ती त्यांच्याशी हस्तांदोलन करताना दिसत आहे. कंगनाने पीएम मोदींना या ग्रहावरील सर्वात शक्तिशाली व्यक्ती म्हटले आहे. कंगनाने केलेल्या या पोस्टची आता सर्वत्र चर्चा होत आहे. कंगनाची ही पोस्ट व्हायरल होत आहे. कंगनाने नरेंद्र मोदींचं कौतुक केलं आहे. या पोस्टमध्ये कंगनाने लिहिलंय कि, ‘माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.‘कंगनाने पुढे लिहिले- ‘लहानपणी रेल्वे प्लॅटफॉर्मवर चहा विकण्यापासून ते या भारतातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती बनण्याचा प्रवास खूप अविश्वसनीय आहे. तुम्हाला दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा.’ कंगनाने पुढे म्हटलंय कि, ’ राम, कृष्णासारखे, गांधीसारखे तुम्ही अमर आहात. तुमचा राजकीय वारसा कोणीही पुसून टाकू शकत नाही, म्हणूनच मी तुम्हाला अवतार समजते. तुमच्यासारखा नेता आम्हाला लाभला त्यासाठी आम्ही धन्य आहोत.’
कंगनाप्रमाणेच बॉलिवूडचे अक्षय कुमार, अनुपम खेर या कलाकारांनी सुद्धा नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण कंगनाने दिलेल्या या शुभेच्छांची सर्वत्र चर्चा होत आहे. हेही वाचा - Tu chal pudha : ‘नवरा बायकोच्या नात्यात फक्त प्रेम नाही आदर हवा’; अश्विनीच्या उत्तराने जिंकलं महिला प्रेक्षकांचं मन ‘इमर्जन्सी’ हा इंदिरा गांधींवर आधारित हा चित्रपट कंगना राणौत दिग्दर्शित करत आहे. यामध्ये कंगना इंदिरा गांधींच्याच भूमिकेत दिसणार आहे. ती दुसऱ्यांदा चित्रपट दिग्दर्शित करत आहे. ‘इमर्जन्सी’ या चित्रपटात तिच्याबरोबर अनुपमी खेर, श्रेयस तळपदे आणि महिमा चौधरी हे कलाकारही मुख्य भूमिका साकारणार आहेत. कंगनाच्या वर्कफ्रंट विषयी बोलायचं झालं तर ‘इमर्जन्सी’ हा इंदिरा गांधींवर आधारित हा चित्रपट कंगना राणौत दिग्दर्शित करत आहे. यामध्ये कंगना इंदिरा गांधींच्याच भूमिकेत दिसणार आहे. ती याआधी ‘धाकड’मध्ये दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. पण तिला ‘इमर्जन्सी’ या आगामी चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत.