मुंबई, 22 ऑक्टोबर- देशभरात सध्या दिवाळीची धूम सुरु आहे. सर्वसामान्य लोकांपासून सेलेब्रेटींपर्यंत सर्वजण दिवाळीच्या तयारीत मग्न आहेत. कोणी फराळ बनवण्यात तर कोणी खरेदी करण्यात व्यग्र दिसून येत आहेत. तर दुसरीकडे बॉलिवूड सेलिब्रेटी दिवाळी पार्टी करण्यात बिझी आहेत. एकापाठोपाठ एक कलाकार दिवाळी पार्टीचं आयोजन करत आहेत. यामध्ये बॉलिवूडमधील सर्व मोठमोठे कलाकार हजेरी लावत आहेत. दिवाळीनिमित्त सर्व कलाकार अगदी ट्रॅडिशनल अंदाजात दिसून येत आहेत. नुकतंच क्रिती सेनन आणि रमेश तौरानी यांनी दिवाळी पार्टीचं आयोजन केलं होतं. दरम्यान मनीष मल्होत्राच्या पार्टीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. कारणही तितकंच खास आहे. कारण या पार्टीत अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर समोरा-समोर आले होते.
बॉलिवूडचा प्रसिद्ध फॅशन डिझाईनर मनीष मल्होत्राने नुकतंच दरवर्षी प्रमाणे यंदाही दिवाळी पार्टी आयोजित केली होती. यावेळी बॉलिवूडचे अनेक कलाकार एकत्र आलेले पाहायला मिळाले. सोशल मीडियावर या पार्टीचे इनसाइड फोटो चर्चेचा विषय ठरत आहेत. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा फोटो इतर कुणाचा नसून बॉलिवूडच्या सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक असणाऱ्या करिश्मा कपूर आणि ऐश्वर्या राय बच्चन यांचा आहे. करिश्मा कपूरने ऐश्वर्या राय बच्चनसोबतच फोटो आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. करिश्माने हा फोटो शेअर करताच चर्चेला उधाण आलं आहे.
(हे वाचा: Katrina Kaif: कतरिना कैफला 'कॅट' हे नाव कोणी दिलं माहितेय का? वाचून वाटेल आश्चर्य)
करिश्मा कपूर आणि ऐश्वर्या राय यांच्या फोटोवर चर्चा होण्याचं कारण अभिषेक बच्चन आहे. कारण अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर यांनी बराच काळ एकमेकांना डेट केलं आहे. या दोघांचं नातं त्यांच्या कुटुंबांपर्यंत पोहोचलं होतं. सन 2002 मध्ये या दोन्ही कुटुंबांनी करिश्मा आणि अभिषेकच्या साखरड्याची घोषणा केली होती. या दोघांचा साखरपुडा अगदी थाटामाटात झाला होता. जया बच्चन यांनी मीडियासमोर करिश्मा कपूरला आपली सून म्हणूनही संबोधलं होतं. तसेच 'मैं प्रेम कि दिवानी हूँ' चित्रपटाच्या सेटवर करीना कपूर अभिषेक बच्चनला भावोजी म्हणून बोलावत असे.त्यामुळे अभिषेक आणि करिश्मा लवकरच लग्नगाठ बांधणार अशी चाहत्यांना अपेक्षा होती. परंतु अचानकपणे या दोन्ही कुटुंबात काहीतरी बिघडलं आणि हा साखरपुडा मोडला होता. त्यानंतर करिश्मा आणि अभिषेक पुन्हा कधीच एकत्र दिसले नाहीत.
परंतु इतक्या वर्षानंतर मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीच्या निमित्ताने करिश्मा आणि अभिषेक एकत्र आले होते. यावेळी करिश्मा आणि ऐश्वर्यामध्ये छान बॉन्डिंग पाहायला मिळालं. त्यांचं बॉन्डिंग पाहून सर्वच थक्क झाले आहेत. मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीसाठी करिश्मा कपूरने गडद लाल रंगाची शिमरी साडी नेसली होती. त्याचवेळी ऐश्वर्या रायने बेबी पिंक रंगाचा सूट परिधान केला होता. पार्टीदरम्यान ऐश्वर्या आणि करिश्माची मैत्री पाहायला मिळाली. यावेळी दोघीनीं एकत्र अनेक फोटोसुद्धा क्लिक केले आहेत. हे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. दरम्यान फोटोमध्ये माधुरी दीक्षितसुद्धा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Abhishek Bachchan, Aishwarya rai, Bollywood, Entertainment