... म्हणून नेहमी सलमान खानचा फोटो खिशात घेऊन फिरतो 'हा' प्रसिद्ध अभिनेता

आजच सलमान खानचा 'भारत' रिलीज झाला असून प्रेक्षकांचा या सिनेमाला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 5, 2019 03:21 PM IST

... म्हणून नेहमी सलमान खानचा फोटो खिशात घेऊन फिरतो 'हा' प्रसिद्ध अभिनेता

मुंबई, 05 जून : सुपरस्टार सलमान खानचा भारत आज सर्व सिनेमागृहात रिलीज झाला. या सिनेमात अभिनेता जॅकी श्रॉफ सलमानच्या वडीलांची भूमिका साकारत आहेत. पण रिअल लाइफमध्येही सलमान आणि जॅकी श्रॉफ यांचं नातं मुलगा आणि वडीलांसारखंच आहे. खऱ्या आयुष्यातही जॅकी सलमानला आपला मुलगा मानतात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जॅकी श्रॉफ यांनी सलमान त्यांच्यासाठी किती खास आहे याचा खुलासा केला.

जॅकी श्रॉफ म्हणाले, 'सलमान माझ्यासाठी खूप खास आहे. तो मला माझ्या  मुलासारखा आहे. त्यामुळे ते नेहमीच प्रोड्यूसरकडे सलमानसाठी काम मागत असत. 1988 मध्ये आलेल्या 'फलक' सिनेमाच्या वेळी मी सलमानचे काही फोटो काढले होते आणि अजूनही मी त्याचे हे फोटो माझ्या खिशात घेऊन फिरतो.  ते पुढे म्हणाले, मी सलमानचे हे फोटो निर्मात्यांना दाखवत असे आणि त्यांना सलमानला कास्ट करण्यासाठी सांगत असे. मी सलमानसाठी अनेक निर्मात्यांशी बोललो होतो कारण, मला माहित होतं हा मुलगा एक दिवस सुपरस्टार होईल.'

‘या’ पाकिस्तानी अभिनेत्रीने हवाई दलाच्या बेपत्ता विमानावरून मोदींची उडवली थट्टाLoading...


 

View this post on Instagram
 

सीढ़ी , साड़ी , लड़की #Bharat #Promotions @katrinakaif


A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

जॅकी श्रॉफ सांगतात, 'एकेकाळी सलमान माझा खूप मोठा फॅन होता. त्याला माझ्या जीन्स आणि शूज खूप आवडत असत.' भारत सिनेमातील जॅकी यांची भूमिका फार मोठी नसली तरीही ते सलमानचे ऑनस्क्रीन बाबा म्हणून खूश आहेत. 'भारत' सिनेमामध्ये जॅकी श्रॉफ पाहूण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहेत.

लग्नाच्या प्रश्नावर सलमान खान म्हणतो, या संकल्पनेवर माझा विश्वास...
समीक्षकांच्या मते, सलमान खानचा 'भारत' या वर्षातील सर्वात मोठा सिनेमा ठरू शकतो. प्रेक्षकांकडून या सिनेमाला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमामध्ये सलमान खान व्यतिरिक्त कतरिना कैफ, दिशा पाटनी, सुनील ग्रोवर, तब्बू, जॅकी श्रॉफ अशी तगडी स्टार कास्ट आहे.

Bharat Public Review- अ‍ॅक्शन नाही तर रडवतो सलमानचा ‘भारत’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 5, 2019 03:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...