मुंबई, 19 मे : बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांच्या यादीत जॅकी श्रॉफ यांचं नाव सामील होतं. जॅकी श्रॉफ यांनी आपल्या करिअरमध्ये जवळपास 250 चित्रपटात काम केलं आहे. बॉलीवूडपासून प्रादेशिक भाषांपर्यंत त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा प्रेक्षकांच्या मनावर उमटवला आहे. मॉडेलिंग पासून आपल्या करिअरची सुरुवात केलेल्या जॅकी श्रॉफ याना नशिबाने बॉलीवूडमध्ये आणलं. जॅकी त्याच्या उदार आणि मनमोकळ्या स्वभावामुळे चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहेत. परंतु तुम्हाला माहिती आहे का की, 56 वर्षांपासून जॅकी एक दुःख सहन करत आहेत. जॅकी श्रॉफ असं दुःख सहन करतायत जे विसरणे कठीण असते आणि ते आठवलं की आजही ती वेदना देतं. काय आहे नेमका हा किस्सा जाणून घेऊया. जॅकी श्रॉफच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल लोकांना क्वचितच माहिती आहे . दोन वर्षांपूर्वी, आपल्या आयुष्याबद्दल त्यांनी एक मोठा खुलासा केला होता. यावेळी त्यांनी ‘एका घटनेची वेदना मी गेल्या 56 वर्षांपासून सहन करत आहे. आजही ती आठवली तरी त्रास होतो’ असा खुलासा केला होता.
‘ट्वीक इंडिया’मध्ये ट्विंकल खन्नासोबत संवाद साधताना त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याविषयी अनेक माहित नसलेल्या गोष्टी चाहत्यांसोबत शेअर केल्या होत्या. यावेळी त्यांनी सांगितलं होतं की, त्याने आपल्या मोठ्या भावाला डोळ्यांसमोर मरताना पाहिले. त्यावेळी अभिनेता फक्त 10 वर्षांचा होता आणि त्याचा भाऊ 17 वर्षांचा होता. तो समोरून त्याला मरताना पाहत होता, पण त्याला वाचवण्यासाठी तो काहीच करू शकत नव्हता. ‘मैने प्यार किया’ मधून झाली हिट; C-ग्रेड चित्रपटात केलं काम; एका चुकीमुळं अभिनेत्रीनं भोगला 3 वर्षांचा तुरुंगवास वडिलांची आठवण काढत ते म्हणाले होते की, ‘मला चांगलं आठवतंय की माझ्या भावाला वडील म्हणाले आजचा दिवस वाईट आहे, बाहेर जाऊ नकोस. पण भावाने ऐकले नाही आणि वडिलांचे म्हणणे खरे ठरले.’ अभिनेत्याने पुढे सांगितले की, त्यांचा भाऊ सेंच्युरी मिलमध्ये काम करत असे. वडिलांनी आज गिरणीत जाऊ नकोस असे सांगितले होते पण त्याने ऐकले नाही. सेंच्युरी मिल्सच्या बाहेर समुद्र आहे, तिथे एक माणूस बुडत होता. ते पाहताच त्याने त्या माणसाला वाचवण्यासाठी समुद्रात धाव घेतली. पण त्यांच्या भावाला पोहता येत नव्हतं. पण तरीही त्याने त्या माणसाला वाचवण्यासाठी समुद्रात उडी मारली आणि तो बुडाला.
जॅकी श्रॉफ पुढे म्हणाले की, ‘ती व्यक्ती वाचली, पण माझा भाऊ बुडाला. हे सगळं डोळ्यासमोर घडलं. माझा भाऊ बुडताना पाहून मी त्याच्या दिशेने केबल वायर फेकली, पण माझे प्रयत्न व्यर्थ गेले आणि मी माझ्या भावाला वाचवू शकलो नाही. मला त्या वेदनांवर ओरखडे ओढायचे नाहीत.’ असे जॅकी श्रॉफ यांनी सांगितले होते. जॅकी पुढे म्हणाला की मला माहित आहे की ही एक दुःखाची गोष्ट आहे, अनेक लोक दुःखातून जातात. पण माझा भाऊ माझा पहिला हिरो होता. याविषयी सांगताना ते म्हणाले की, ‘आपण एकच गोष्ट शिकलो आहोत, दुसऱ्याला ऊब देण्यासाठी आपण आपले घर जाळू शकत नाही. तो १७ वर्षांचा आणि मी १० वर्षांचा. त्याने उत्तम काम केले. त्याने मित्रासाठी जीव दिला, ही खूप मोठी गोष्ट आहे.’