जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / बॉयफ्रेंडसोबत BOLD अवतारात दिसली जॅकी श्रॉफची लेक, PHOTO VIRAL

बॉयफ्रेंडसोबत BOLD अवतारात दिसली जॅकी श्रॉफची लेक, PHOTO VIRAL

बॉयफ्रेंडसोबत BOLD अवतारात दिसली जॅकी श्रॉफची लेक, PHOTO VIRAL

कृष्णा तिच्या खासगी आयुष्यामुळे बऱ्याचदा चर्चेत असते. सध्या तिचे काही फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

    मुंबई, 27 सप्टेंबर : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता जॅकी श्रॉफचा मुलगा टायगर श्रॉफ सध्या बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये गणला जातो. आपल्या अ‍ॅक्शन, स्टंट आणि डान्स मूव्ह्समुळे टायगर सध्या बॉलिवूडचा सुपरस्टार झाला आहे. पण जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णा मात्र सिनेमांपासून दूर आहे. पण कृष्णा एखद्या अभिनेत्रीपेक्षा कमी ग्लॅमरस नाही. तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर अनेक बोल्ड फोटो पाहायला मिळतील. तसेच अनेकदा कृष्णा तिच्या खासगी आयुष्यामुळे बऱ्याचदा चर्चेत असते. कृष्णानं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत. जे सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत बीचवर फिरताना दिसत आहेत. यात ब्लॅक कलरच्या बिकिनीमध्ये कृष्णाचा बोल्ड अवतार पाहायला मिळत आहे. तिनं बॉयफ्रेंड एबन हायम्सचा हात पकडला असून तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. Vogue Beauty Awards मध्ये मलायका अरोराचा ग्लॅमरस लुक, पाहा तिचे HOT PHOTO

    जाहिरात

    कृष्णानं अशाप्रकारे बॉयफ्रेंडसोबत बोल्ड फोटो शेअर करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही कृष्णा आणि तिच्या बॉयफ्रेंडचे किस करतानाचे फोटो व्हायरल झाले होते. कृष्णानं तिच्या इन्स्टाग्रामवर बॉयफ्रेंड सोबत अनेक फोटो शेअर केले आहेत. अभिनंदन! ग्लॅमरपासून दूर असलेल्या या ‘स्टार किड’नं घातली देशाच्या सन्मानात भर याशिवाय काही दिवसांपूर्वी एबनने सुद्धा त्याच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली होती ज्यामध्ये त्यानं कृष्णाला वाइफ म्हणत या स्टोरीमध्ये तिला टॅग सुद्धा केलं होतं. त्यामुळे ही दोघंही लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चा सगळीकडे सुरू आहेत.  मात्र याबद्दल या दोघांनीही कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही.

    कृष्णा बॉलिवूडपासून दूर असली तरीही तिचं ग्लॅमर एखाद्या अभिनेत्री पेक्षा कमी नाही. ती सुद्धा भाऊ टायगरप्रमाणे फिटनेस फ्रिक आहे. ती तिच्या इन्स्टाग्रामवर अनेक फिटनेस व्हिडीओ शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी तिनं टायगरसोबत फोटोशूट सुद्धा केलं होतं. कृष्णाचा सोशल मीडियावर स्वतःचा वेगळा चाहता वर्ग असून तिच्या चाहत्यांची तिच्यावर नेहमीच नजर असते. Marjaavaan Trailer : ‘कमिनेपन की हाइट… 3 फुट’ रितेश देशमुखचा नवा व्हिलन अवतार ========================================================= SPECIAL REPORT: शत्रूसोबत दोन हात करणारं भारतीय नौदल आता आणखी बळकट होणार!

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात