फॅशन आयकॉन अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच काही ना काही कारणानं चर्चेत असते. कधी तिची ड्रेसिंग स्टाईल तर कधी व्हायरल व्हिडीओ आणि अगदीच काही नाही तर अभिनेता अर्जुन कपूरसोबतची रिलेशनशिप.
मलायका अरोरानं नुकतीच वोग ब्युटी अवॉर्ड फंक्शनला हजेरी लावली होती. यानंतर तिनं तिच्या इन्स्टाग्राम अकउंटवर नुकतेच काही फोटो शेअर केले आहे.
या फोटोंमध्ये मलायकाचा हॉट आणि ग्लॅमरस अवतार पाहायला मिळत आहे. या अवॉर्ड फंक्शनला मलायकानं व्हाइट कलरचा हाय स्लीट गाऊन परिधान केला होता.
सॉफ्ट कर्ल्स, रेड लिपस्टिक आणि हाय हिल्समध्ये मलायका कमालीतची हॉट आणि ग्लॅमरस दिसत होती. यामुळे या संपूर्ण कार्यक्रमात मलायका आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.
या फंक्शनला मलायकासोबत तिची बहीण अमृता अरोरानंही हजेरी लावली होती. यावेळी तिनं ब्लॅक आणि गोल्डन कलरचा गाऊन परिधान केला होता.
मलायकानं याच ग्लॅमरस लुकचे काही फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले. ज्यावर युजर्सच्या अनेक प्रतिक्रिया येत होत्या मात्र अर्जुन कपूरच्या कमेंटनं सर्वांचं लक्ष वेधलं.
अर्जुननं मलायकाच्या फोटोवर कमेंट करताना फायर इमोजी पोस्ट केला. अर्जुनची ही कमेंट पाहिल्यावर हे दोघंही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले आहेत हे लक्षात येतं.