Marjaavaan Trailer : 'कमिनेपन की हाइट... 3 फुट' रितेश देशमुखचा नवा व्हिलन अवतार

Marjaavaan Trailer : 'कमिनेपन की हाइट... 3 फुट' रितेश देशमुखचा नवा व्हिलन अवतार

या सिनेमात अभिनेता रितेश देशमुख पुन्हा एकदा व्हिलनच्या भूमिकेत दिसत आहे.

  • Share this:

मुंबई, 26 सप्टेंबर : लाखो तरुणींच्या हृदयाची धडकन असलेला अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि तारा सुतारिया यांच्या प्रमुख भूमिका असलेला बहुचर्चित सिनेमा 'मरजावाँ' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. जबरदस्त अ‍ॅक्शन आणि डायलॉगचा तडका असलेल्या या ट्रेलरला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. प्रेम आणि तिरस्काराचं मिश्रण असलेल्या या सिनेमात अभिनेता रितेश देशमुख पुन्हा एकदा व्हिलनच्या भूमिकेत दिसत आहे.

या सिनेमात सिद्धार्थ मल्होत्रा रघूची भूमिका साकारत आहे. जो संपूर्ण सिनेमात डायलॉगबाजी करताना दिसतो. सिद्धार्थची ही भूमिका अमिताभ बच्चन यांच्या दिवार मधील भूमिकेशी मिळतीजुळती असल्याचं बोललं जात आहे. तर तारा सुतारियानं एका मुक्या मुलीची भूमिका साकारताना दिसत आहे. संपूर्ण ट्रेलरमध्ये ती हावभाव करुन बोलताना दिसत आहे. याशिवाय या सिनेमात अभिनेत्री राकुलप्रीत सिंह हिची सुद्धा महत्त्वाची भूमिका आहे. हा सिनेमा 8 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

ट्रेलर लॉन्चच्या आधी रितेश देशमुख आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्टर शेअर केलं होतं. ज्यात अभिनेत्री तारा सुतारिया दिसत होती. हे पोस्टर शेअर करताना सिद्धार्थनं लिहिलं, प्रेम आणि बदल्याच्या सर्व मर्यादा आता पार होणार आहेत. या पोस्टरवर सिद्धार्थ मल्होत्रा जखमी अवस्थेत दिसत आहेत. तर तारा त्याच्या मिठीत असेलेली दिसत आहे. 'इश्क में मरूंगा भी, मारूंगा भी.' अशी टॅगलाइन सुद्धा देण्यात आली आहे.

या सिनेमात रितेश देशमुखसोबत सिद्धार्थ मल्होत्रा, तारा सुतारिया आणि राकुलप्रीत सिंह यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन मिलाप जावेरी यांनी केलं असून  भूषण कुमार, दिव्या खोसला कुमार, कृष्ण कुमार (टी-सीरीज़), मोनिशा आडवाणी, मधु भोजवानी आणि निखिल आडवाणी (एम्मेन एंटरटेनमेंट) यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.

==================================================================

पुणे: पाण्यात अडकलेल्या चिमुकल्याच्या रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 26, 2019 05:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading