मुंबई, 25 नोव्हेंबर: अभिनेता सलमान खान बिग बॉस मराठीच्या (Salman Khan on Bigg Boss Marathi) चावडीवर महेश मांजरेकर (Mahesh Manjekar) यांच्यासह स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. याबाबत आधी सोशल मीडियावर शक्यता वर्तवली जात होती की, सलमान मराठी टेलिव्हिजनवर दिसणार आहे. आता सलमानच्या बिग बॉस मराठीच्या चावडीवर खास एंट्री घेणार आहे हे कलर्स मराठीच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम पेजवरुन जाहीर करण्यात आलं आहे. यामध्ये बिग बॉसच्या स्टेजवर अस्खलित मराठीतून बोलताना सलमान खान दिसणार आहे. बिग बॉसचे सदस्य आणि प्रेक्षक या क्षणाची वाट आतुरतेने बघत होते. बिग बॉस मराठी सीझन 3 च्या चावडीवर सदस्यांना ‘सरप्राईझ’ मिळणार आहे. कारण बॉलिवूडचा भाईजान आणि हिंदी बिग बॉसचा सूत्रसंचालक सलमान खान बिग बॉस मराठीच्या मंचावर येणार आहे. बिग बॉस मराठीच्या सेटवर सलमान खानची धम्माकेदार एंट्री होणार आहे. त्यामुळे या आठवड्यातील चावडी सलमान खानच्या उपस्थितीत रंगणार आहे. हे वाचा- सुहाना खान सोडतेय न्यूयॉर्क! शाहरुख खानच्या लेकीने केली भावुक पोस्ट नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. प्रोमो मध्ये महेश मांजरेकर बोलताना दिसत आहेत की, ‘आपल्या चावडीवर येणार आहे एक खास पाहुणा’. त्यानंतर सलमान एंट्री करताना दिसतो आहे. यावेळी सलमानने असं म्हटलं आहे की, ‘मी येतोय बिग बॉस मराठीच्या चावडीवर’. तो पुढे म्हणतो की, ‘ओ भाऊ जरा चावडीवर या’.
या आठवड्यातील धम्माल मस्ती बिग बॉस मराठीच्या चावडीवर शनिवार-रविवार रात्री 9.30 वा. कलर्स मराठीवर पाहता येणार आहे. बिग बॉस मराठीचं (Bigg Boss Marathi 3) सध्या तिसरं पर्व सुरू आहे आणि या पर्वाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. बिग बॉस मराठी महेश मांजरेकर होस्ट करतात. तर दुसरीकडे बिग बॉस हिंदीच 15 वं पर्वही सुरु आहे. याला म्हणावा तेवढा चांगला प्रतिसाद मिळत नाही. याच हिंदी बिग बॉसच्या मंचावर काही दिवसांपूर्वी महेश मांजरेकर यांनी हजेरी लावली होती. तो भाग प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. आता सलमान खान (salman khan) देखील मराठी बिग बॉसच्या मंचावर हजेरी लावणार असल्याची माहिती समोर आली आहे.