मुंबई, 25 नोव्हेंबर- शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि गौरी खान यांची मुलगी सुहाना खान (Suhana Khan) न्यूयॉर्क (New York) सोडत आहे. ती न्यूयॉर्क विद्यापीठाच्या टिश्च स्कूल ऑफ आर्ट्समध्ये फिल्म मेकिंगचे शिक्षण घेत होती. हे तिच्या लेटेस्ट इंस्टाग्राम पोस्टवरून कळत आहे. सुहानाने काही तासांपूर्वी इंस्टाग्रामवर एक ब्लॅक अँड व्हाइट फोटो (Share Photo) शेअर केला आहे. या फोटोमध्ये एक ट्रक एका मोठ्या इमारतीसमोरून जाताना दिसत आहे. ज्यावर न्यूयॉर्क सोडणाऱ्या लोकांसाठी एक संदेश लिहिला आहे.हा संदेश तिच्यासाठी खास आहे. यातूनच तिने न्यूयॉर्क सोडण्याचा इशारा दिला आहे.
या फोटोमध्ये एक ट्रक एका मोठ्या इमारतीसमोरून जाताना दिसत आहे. ज्यावर न्यूयॉर्क सोडणाऱ्या लोकांसाठी संदेश लिहिला आहे. ट्रकवर लिहिले आहे, “काळजी करू नका, जर तुम्ही न्यूयॉर्क सोडलात, तरीही तुम्ही न्यूयॉर्करच राहाल.” या कॅप्शनसोबत तिने एक हार्टब्रेक इमोजी देखील शेअर केला आहे. सुहानाच्या या पोस्टवर तिच्या मैत्रिणींनीही निराशा व्यक्त केली आहे. तसेच तिच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सुहाना खानच्या एका मैत्रिणीने तिच्या पोस्टमध्ये लिहिले की, “तू आश्चर्यकारक गोष्टी करणार आहेस.” मित्राने लिहिले, “शुभेच्छा मुली!” दुसर्या मित्राने रडणारा इमोजी शेअर करत लिहिले, “मी हे स्वीकारू शकत नाही.” तुम्हला माहिती असेल, सुहाना खान 2019 मध्ये न्यूयॉर्कला गेली होती. तेव्हापासून ती न्यूयॉर्कमधील तिच्या जीवनशैलीची झलक शेअर करत होती. ती अनेकदा तिच्या मैत्रिणींसोबत मस्ती, नाईट आऊट आणि पार्टीचे फोटो शेअर करत होती. शाहरुख खान तसेच तिचे चाहते तिच्या या पोस्टवर भरभरून प्रेम देत असतात. बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वीच सुहाना खानचा मोठा चाहतावर्ग आहे. **(हे वाचा:** आमिर खानने ‘KGF 2’ च्या मेकर्सची मागितली माफी! वाचा नेमकं काय घडलं ) न्यूयॉर्क विद्यापीठापूर्वी, सुहानाने इंग्लंडमधील आर्डिंगली कॉलेजमध्ये शिक्षण घेतले होते, जिथे तिला नाटकातील योगदानाबद्दल पुरस्कार देण्यात आला होता. इंग्लंडमध्ये त्यांनी ‘द ग्रे पार्ट ऑफ ब्लू’ या लघुपटात काम केले आणि ‘रोमिओ अँड ज्युलिएट’च्या निर्मितीमध्येही मुख्य भूमिका होती. शाहरुख खानप्रमाणेच सुहानालाही अभिनय करायचा आहे. पण तिने अट घातली आहे की तिला आधी तिचे शिक्षण पूर्ण करावे लागेल. यापूर्वी, वोगला दिलेल्या मुलाखतीत सुहानाने सांगितले होते की, तिचे नेहमीच अभिनेत्री बनण्याचे स्वप्न आहे. आणि तिचे वडील शाहरुख यांनाही वाटते की ती अभिनयाबाबत गंभीर आहे.