मुंबई, 08 एप्रिल : कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाचं कंबरडं मोडलं आहे. इटली, स्पेन यांसारख्या देशांनी तर गुडघे टेकले आहे. भारतामध्ये अद्याप परिस्थिती हाताबाहेर गेली नसली तरीही भयावह परिस्थिती नक्कीच आहे. आपण काळजी घेतली नाही तर परिस्थिती हाताबाहेर जायला फार वेळ जाणार नाही. दरम्यान अनेक कलाकार या परिस्थितीची जाणीव सर्वांना करुन द्यायचा प्रयत्न करत आहेत. अभिनेत्री मुक्ता बर्वेचा एक व्हिडीओ मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यावरून एकंदरित आपण कशाशी लढत आहोत याचा अंदाज येईल. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
(हे वाचा-corona: आईच्या मृतदेहावर प्रशासनानं केले अंत्यसंस्कार, मुलानं दुरूनच घेतलं दर्शन)
प्रख्यात इटालियन लेखिका फ्रानसेस्का मेलँड्री या इटलीची राजधानी रोममध्ये काही आठवडे अडकल्या आहेत. त्यांनी एक खुलं पत्र लिहिलं आहे. युरोपियन देशांमधील रहिवाशांना उद्देशून त्यांना 'From Your Future' अर्थात 'तुमच्या भविष्यकाळाकडून' या मथळ्याखाली एक पत्र लिहिलं आहे. जगभरातील वृत्तपत्रांमध्ये हे पत्र प्रसिद्ध करण्यात आलं असून आता मराठीतही त्याचा अनुवाद करण्यात आला आहे. या पत्रामध्ये लेखिकेने युरोपचा भविष्यकाळ किंवा जगाचा भविष्यकाळ कोरोनामुळे कसा असेल याबाबत भाष्य केले आहे. यामध्ये तिने स्वत:चे अनुभव सांगितले आहेत. या पत्राच्या मराठी अनुवादाचे वाचन अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने केले आहे. मिलेनिअल मराठी या यूट्यूब चॅनेलने हा अनुवाद केला आहे.
(हे वाचा-कोरोनाचा प्रकोप, 24 तासांत नवे 504 रुग्ण, वाचा कोणत्या राज्यात किती रुग्ण)
'कोरोनाच्या विळख्यात आम्ही थोड तुमच्या पुढे आहोत, जसं वुहान होतं आमच्या काही आठवडे पुढे. आम्ही तसच वागलो जसं आता तुम्ही वागत आहात.' अशी काहीशी सुरूवात असणाऱ्या या पत्रातून लिखिकेने वास्तवाचं दर्शन घडवलं आहे. परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी सावध होण्याचा इशारा या पत्रातून देण्यात आला आहे.
पत्र जरी युरोपियनांना असलं तरी त्यातील अनेक बाबी जगातील इतर देशांना आणि सहाजिकच भारताला सुद्धा लागू होतात.
संपादन-जान्हवी भाटकर
Source- Millennial Marathi